Tuesday, October 27, 2026
HomePoliticalबंद ई-वाहन चार्जिंग पॉइंट सुरू करा; बसपाची आयुक्तांकडे मागणी

बंद ई-वाहन चार्जिंग पॉइंट सुरू करा; बसपाची आयुक्तांकडे मागणी

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या पार्किंग परिसरातील बंद व नादुरुस्त ई-वाहन चार्जिंग पॉइंटची तातडीने दुरुस्ती करून ते पुन्हा सुरू करावेत, तसेच शहरातील विविध झोन आणि शासकीय कार्यालयांच्या परिसरात नवीन ई-वाहन चार्जिंग सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) BSP वतीने नगरसेविका सोनिया उंदीरवाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे. यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले. Start closed e-vehicle charging points

पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ई-वाहनांचा वापर वाढत असताना चार्जिंग सुविधांची उपलब्धता आणि त्यांची नियमित देखभाल हा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका परिसरातील बंद चार्जिंग पॉइंट तातडीने कार्यान्वित करावेत आणि नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील विविध ठिकाणी नवीन चार्जिंग केंद्रे उभारावीत, अशी मागणी बसपाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

चार्जिंग सुविधांची देखभाल आणि युवकांना प्रशिक्षण द्या

ई-वाहन चार्जिंग केंद्रांची नियमित देखभाल व दुरुस्ती करावी, चार्जिंगसाठी येणाऱ्या वाहनधारकांना आवश्यक मदत आणि मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. याशिवाय स्थानिक युवकांना ई-वाहन चार्जिंग सुविधांच्या संचालन व देखभालीचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, यावरही भर देण्यात आला.

शहरात ई-वाहनांचा वापर सुलभ होण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी सोनियाताई प्रशांत उंदिरवाडे (नगरसेविका, प्रभाग क्र. १७), प्रशांतभाऊ उंदिरवाडे, इंजि. विमित कोसे (शहराध्यक्ष, बसपा), दादाजी धाकडे (शहर संघटक), किशोरभाऊ चिकटे (बाबूपेठ झोन प्रभारी), अखिल निमगडे (शहर सदस्य), जेवन कांबळे आणि मनोहर साखरे (विधानसभा कोषाध्यक्ष) आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular