sports festival, the youth danced to the voice of singer Abhijit Kosambi
चंद्रपूर :- मुंबई येथील प्रसिध्द रागा बॅंड च्या माध्यमातून आज (ता. २०) महागायक अभिजित कोसंबी लोकप्रिय गीतांचा नजराणा सादर करताना त्यांच्या आवाजावर बेभानपणे तरुणाई थिरकली. एकापेक्षा एक सादर झालेल्या सदाबहार गीतांमुळे काही काळ क्रीडा महोत्सव सप्तसुरात रंगून गेला.
२६ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचे युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते तालुका क्रीडा संकुल विसापूर येथे उद्घाटन करण्यात आले. 26th Maharashtra State Inter University Sports Festival
या उद्घाटन समारंभानंतर खेळाडू, निमंत्रित मान्यवर तसेच चंद्रपूर येथील स्थानिक नागरिकांकरिता महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग व गोंडवाना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कलाकारांच्या सादरीकरणाने दर्शक भारावून गेल्याने हा कार्यक्रम स्पर्धकांसाठी आनंदाची पर्वणीच ठरला.
अभिजित कोसंबी यांना गायिका कणिका दुबे यांनी उत्तम साथ दिली, श्रोत्यांचाही त्यांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे “शिवबा राजं…., शिवबा राजं….” या गीतामुळे तरुणाईमध्ये प्रचंड जोश संचारला. youth danced to the voice of singer Abhijit Kosambi
उज्वला इनवाते यांच्या नृत्याने सर्वांना मोहित केले. विजय मधुमटके व श्री हर्ष यांनी संयोजनात योगदान दिले.
रागा बँड चे संगीत दिग्दर्शन सतीश बडेल यांनी केले असून सहाय्यक दिग्दर्शन लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी केले आहे. मंच संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.
या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आमदार तथा माजी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे सहकार्य लाभल्याने विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार, कुलगुरु डॉ. प्रशान्त बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य गुरुदास कामडी, प्रशांत दोंतुलवार, अधिसभा सदस्य डॉ. प्रवीण जोगी, संजय रामगिरवार, दीपक धोपटे, डॉ. संजय सिंग, डॉ. सतीश कन्नाके, डॉ. शिला नरवाडे यांच्यासह निमंत्रित मान्यवर, प्राध्यापक, संघ व्यवस्थापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, खेळाडू, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांच्या गीताने उपस्थित झाले मंत्रमुग्ध !
आयोजकांच्या आग्रहास्तव गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण यांनी कैलाश खेर यांनी गायलेले “तेरी दिवानी” हे सुफी गीत सादर केले. त्यांच्या समधुर आवाजाने सर्व रसिक, प्रेक्षक, विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.



