Friday, January 17, 2025
HomeMNC Chandrapurमनपाच्या तिरंगा ध्वज रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

मनपाच्या तिरंगा ध्वज रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response to Tiranga / Tricolor flag rally of Chandrapur municipality

चंद्रपूर :- ‘हर घर तिरंगा’ अर्थात घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत चंद्रपूर शहर महानगर पालिकेतर्फे Chandrapur MNC आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा ध्वज दुचाकी रॅलीला Tiranga Rally उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दुचाकी रॅलीत मोठ्या संख्येने मनपाचे अधिकारी – कर्मचारी तसेच नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. Spontaneous response to Tricolor flag rally of Chandrapur municipality

मंगळवारी सकाळी 10.30 वाजता प्रियदर्शिनी सभागृह, चंद्रपूर येथून महापालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आयुक्त श्री. पालीवाल म्हणाले, घरोघरी तिरंगा अभियानात आतापर्यंत शहरात 30 हजार ध्वजांचे वाटप करण्यात आले आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरी, प्रत्येक दुकानात व विविध आस्थापनेत तिरंगा लागावा, असे आवाहन त्यांनी केले.

सदर दुचाकी रॅली प्रियदर्शनी चौक ते वरोरा नाका, सावरकर चौक, बंगाली कॅम्प, परत सावरकर चौक, प्रियदर्शिनी चौक, जटपुरा गेट, अंचलेश्वर गेट, बागला चौक ते अंचलेश्वर गेट असे मार्गक्रमण करीत मनपा कार्यालय, गांधी चौक येथे रॅलीची सांगता करण्यात आली.

रॅलीत आयुक्त विपीन पालीवाल, जिल्हा नगर विकास सहआयुक्त विद्या गायकवाड, अतिरीक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले यांनी दुचाकीवर स्वार होत सहभाग नोंदविला. याप्रसंगी भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करण्याची तिरंगा शपथ घेण्यात आली. तिरंगा फुगे आकाशात सोडण्यात आले. विविध वाहनांना तिरंगा रथ बनविण्यात आले होते. भारतमाता तसेच विविध महात्म्यांची वेशभूषा करून शालेय विद्यार्थी उपस्थित होते. तसेच उपस्थितांनी येथे लावण्यात आलेल्या कॅनवासवर जय हिंद, भारत माता की जय लिहून अभियानास समर्थन दर्शविले.

याप्रसंगी शहर अभियंता विजय बोरीकर, नगर रचनाकार सुनील दहीकर, सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे, सचिन माकोडे, संतोष गर्गेलवार, डॉ.नयना उत्तरवार, रवींद्र कळंबे, अतुल टिकले, आशिष भारती, डॉ.अमोल शेळके, नागेश नित, रफीक शेख, सोनू थुल, भूपेश गोठे, संजय टिकले, भुषण ठाकरे, डॉ.अश्विनी भारत,आशिष जीवतोडे तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular