Saturday, August 29, 2026
HomeMNC Chandrapurचंद्रपुरातील पाणीटंचाई समस्या सोडवा

चंद्रपुरातील पाणीटंचाई समस्या सोडवा

Solve the water shortage problem in Chandrapur – BSP’s statement to the Municipal Commissioner

चंद्रपूर :- शहरातील प्रभाग क्र. 17 मधील बाबानगर, बाबूपेठ तसेच प्रभाग क्र. 7 मधील जटपूरा व जलनगर वॉर्ड येथे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टी, चंद्रपूरच्या वतीने प्रभाग क्र. 13 च्या नवनिर्वाचित नगरसेविका सोनियाताई उंदिरवाडे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले. Solve the water shortage problem in Chandrapur City

शहरातील बाबूपेठ आणि जटपुरा प्रभागात सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अत्यंत अपुरा होत असून पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्ह पूर्ण क्षमतेने (फुल व्हॉल्व्ह) उघडला जात नसल्यामुळे नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. परिणामी महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन वापरासाठी पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता, संबंधित भागात नियमित पाणी टँकर उपलब्ध करून देण्यात यावेत तसेच पाणीपुरवठा पूर्ण दाबाने व सुरळीत करण्यात यावा, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने आवश्यक उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती करण्यात आली.

बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रशासनाने या गंभीर विषयाकडे सहानुभूतीपूर्वक व तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदन सादर करताना पूजा रत्नपारखी, प्रशांत उंदिरवाडे, किशोर चिकाटे, विमित कोसे, विवेक दुपारे, प्रणित तोडे, प्रमोद अलोने, विशाल भैस, हर्षल मोहुरले व संदीप मेश्राम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular