Monday, May 25, 2026
HomeSocialराष्ट्रसंत संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी

राष्ट्रसंत संत गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी

National saint Sant Gadge Maharaj’s birth anniversary celebrated with enthusiasm in Rajura

चंद्रपूर :– स्वच्छता, सेवा आणि समाजप्रबोधन यांचे जिवंत प्रतीक असलेल्या महान कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजुरा शहरात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. National saint Sant Gadge Maharaj’s birth anniversary

यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले. अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता अभियान आणि समाजसेवेसाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करणाऱ्या संत गाडगे महाराज यांच्या कार्याचा यावेळी उपस्थितांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या विचारांचे आजच्या पिढीने अनुकरण करणे हीच खरी जयंती साजरी करण्याची भावना असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास राजुरा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष दिलीप देरकर, आरोग्य व स्वच्छता सभापती अनंतकुमार ताजने, शिक्षण सभापती पूनम गिरसावडे, महिला व बालकल्याण सभापती गीता पाथडे यांच्यासह नगरसेवक सिद्धार्थ पाथडे, इंदू निखाडे, मंगला मोकडे, मयुरी पानपाटे, जुबेर शेख, स्वप्नील मोहुर्ले, एजाज अहेमद, माजी नगरसेवक हर्जित सिंग, शाकीर सय्यद तसेच राजुरा धोबी समाजाचे तालुकाध्यक्ष राजकुमार चिंचोलकर, तालुका सचिव मनोहर वाघमारे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी रमेश बेसुरवार, मधुकर चिंचोलकर, मनोज नांदे, मुक्तेश्वर क्षीकोंडावार, संजय भोजेकर, ज्ञानेश्वर बेसुरवार, ओमदेव क्षीरसागर, पंकज बेसुरवार, मुरलीधर क्षीकोंडावार, नथु वाघमारे, राजू भोजेकर, कवडू भोजेकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला.

कार्यक्रमात संत गाडगे महाराजांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच स्वच्छ, सुंदर, हिरवे राजुरा करण्याच्या संकल्पासह स्वच्छता आणि सामाजिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular