Solve the problems of the Tibetan refugee brothers immediately – V. D. Meshram
चंद्रपूर :- तिबेट वरून भारतात वास्तव्यास आलेले शरणार्थी बांधव Tibetan अनेक वर्षापासून आदरणीय भंते दलाई लामा Monk Dalai Lama यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण देशामध्ये विभिन्न ठिकाणी निर्वासित वसाहती स्थापन करून देशात शांतिने व गुण्यागोविंदाने राहतात.
विविध राज्याच्या राज्य सरकारांनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शेती, वस्त्रोद्योग, हस्तकला व उलन कपड्यांचे व्यवसाय करण्याकरिता प्रोत्साहन दिले. Solve the problems of the Tibetan refugee
चंद्रपूर शहरात मागील 40 वर्षांपासून तिबेटियन शरणार्थी बांधव शहरातील नागरिकांकरिता हिवाळ्यात माफक दरात स्वेटर व उलन कपडे चंद्रपूर वासियांना विक्रीकरिता उपलब्ध करून देतात, ज्याला तिबेटियन बाजार म्हणूनही संबोधल्या जाते. त्यांच्या काही मूलभूत समस्यांवर तोडगा काढण्याकरिता भारत सरकारच्या गृहमंत्रालयाद्वारे वेळोवेळी विविध आदेश काढण्यात आले.
या बाबींचा संदर्भ घेऊन तिबेटियन बांधवांच्या मूलभूत समस्या करिता MNC Chandrapur विपिन पालीवाल आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिका यांना रिपाई नेते व्ही. डी. मेश्राम यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले.
यावेळी आयुक्तांनी तिबेटीयन यांना भेडसावणाऱ्या समस्याचा त्वरित निराकरण करण्याचे आश्वासन दिले
शिष्टमंडळात तिबेटियन शरणार्थी श्री. प्रेमा कर्मा, श्री. केलसांग वांगडू, श्री कर्मा बुजगियाल, डॉ. पियुष मेश्राम, नरेश दास इत्यादी उपस्थित होते.