चंद्रपूर :- महावितरणमधील महिला कर्मचाऱ्यांकरिता नवरात्रमध्ये “सन्मान सौदामिनीचा” हा कार्यक्रम औसंवि/ब/३ “सन्मान सौदामिनीचा” ३४९३८ दि. ०९/१०/२०२६ या परिपत्रकानुसार चंद्रपूर परिमंडळ कार्यालयात साजरा करण्यात आला. Honoring Saudamini’ (Women) at MSEDCL
स्त्री शक्तीला समर्पित नवरात्र उत्सवाला दिनांक ११/१०/२०२६ पासून प्रारंभ झालेला आहे. नवरात्र नऊ दिवसांमध्ये आदिशक्ती स्वरुप दुर्गादेवीच्या नऊ रुपांची पुजा केली जाते. हा उत्सव म्हणजे महिलांच्या शक्तीचा, त्यांच्या विविध कला गुणांचा आणि त्यांच्यातील क्षमतेचा गौरव करणारा आहे. महावितरण कंपनी ही वीज क्षेत्राशी निगडित आहे, वीज क्षेत्र मानवी जीवनाची मुलभुत गरज बनलेली आहे. सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा सोबतच तत्पर ग्राहक सेवेची जबाबदारी व कर्तव्य महावितरणच्या माध्यमातुन महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत:ला सिध्द केले आहे. A Tribute to the Contributions of Female Employees During Navratri
महावितरणची भरारी.., 7 पुरस्काराने सन्मान……
दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी स्त्री शक्तीला समर्पित ‘सन्मान सौदामिनीचा’ या नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून चंद्रपूर परिमंडळात माननीय श्री. हरीश गजबे , मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ, यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत महिला शक्तीचा प्रातिनिधिक गौरव म्हणून महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचे पेन व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित महिला प्रतिनिधींना महावितरणमध्ये सेवा देताना आलेले अनुभव कथन करण्याची संधी त्यांना मिळाली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रमेश सानप, अधीक्षक अभियंता (पा.आ.), चंद्रपूर परिमंडळ, तर प्रमुख अतिथी म्हणून मनोज धाबर्डे, अधीक्षक अभियंता, चंद्रपूर मंडळ, असित ढाकणेकर, सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.सं.), चंद्रपूर परिमंडळ, श्रीमती कल्पना जांगडे, अध्यक्ष, चंद्रपूर ग्राहक तक्रार निवारण मंच; प्रवीण बिसेन, कार्यकारी अभियंता (प्रशासन), चंद्रपूर परिमंडळ, प्रसन्न श्रीवास्तव, कार्यकारी अभियंता, ग्राहक व तक्रार निवारण, विशाल पिपरे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, डॉ. अविनाश आचार्य, वरिष्ठ व्यवस्थापक (मा.सं.), तसेच नंदकुमार नरड, जनसंपर्क अधिकारी (प्रभारी) यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमास चंद्रपूर परिमंडळातील अधिकारी, कर्मचारी तसेच महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करणे, त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे आणि समाजातील स्त्री शक्तीचे महत्त्व अधोरेखित करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
