Sunday, September 27, 2026
HomeEducationalशिंपी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

शिंपी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चंद्रपूर :- शिंपी समाजाच्या वतीने आयोजित स्नेह मिलन तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या परिचय व स्वागत-सत्कार कार्यक्रमास आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे ही केवळ सत्काराची बाब नसून त्यांच्या पुढील वाटचालीला प्रोत्साहन देणारे महत्त्वाचे पाऊल असल्याचे प्रतिपादन केले. Shimpi society felicitates meritorious students

कामगार बंधूंसोबत “मन की बात” चा संवाद……

यावेळी अँड सुरेश तालेवार, विजय आक्केवार,गौरीशंकर रापर्तीवार, संजय मुप्पीडवार आदींची उपस्थिती होती.

      आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, समाजाची प्रगती ही केवळ आर्थिक विकासावर अवलंबून नसून शिक्षण, संस्कार आणि गुणवत्तेच्या बळावर समाजाची खरी उन्नती होत असते. आज विविध क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा परिचय करून त्यांचा सन्मान करण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे त्यांच्या मेहनतीचे फळ असून त्यांच्या यशातून समाजातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.

   आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच कौशल्य विकास, आधुनिक तंत्रज्ञान आणि बदलत्या संधींचा स्वीकार करणे आवश्यक आहे. पालकांनीही आपल्या मुलांच्या शिक्षणाला आणि त्यांच्या स्वप्नांना प्रोत्साहन द्यावे. समाजातील प्रत्येक कुटुंबातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात पुढे जावा, यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचेही आमदार जोरगेवार यांनी सांगितले.

   स्नेह मिलनाच्या माध्यमातून समाजातील बांधव एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होते आणि सामाजिक एकोपा अधिक मजबूत होतो. अशा कार्यक्रमांमुळे समाजातील नव्या पिढीला आपल्या समाजाशी जोडले जाण्याची तसेच ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळण्याची संधी मिळते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी अँड सुरेश तालेवार यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

   यावेळी संतोष शनगणवार, प्रशांत गटलेवार, अशोक कीर्तीवार, निलेश नंदगिरवार तसेच शिंपी समाजातील गुणवंत विद्यार्थी, पालक, समाजबांधव तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा परिचय करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular