चंद्रपूर : डॉ. अनिल आर. खुजे यांनी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विषयात पीएच.डी. पदवी संपादन करून आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. विक्रांत विद्यापीठ, ग्वालियर येथून त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. Dr. Anil Khuje awarded Ph.D.
शिक्षण क्षेत्रातील त्यांची सातत्यपूर्ण वाटचाल, अभ्यासू वृत्ती, मेहनत आणि तांत्रिक ज्ञानाची आवड यामुळे त्यांनी ही उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, डॉ. अनिल आर. खुजे यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना (तांत्रिक विभाग), चंद्रपूर जिल्हाध्यक्ष म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील तांत्रिक व व्यावसायिक विषयांना चालना देण्यासोबतच शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी ते कार्यरत राहणार आहेत. Appointed District President of Shikshak Sena (Technical)
पीएच.डी. पदवी आणि शिक्षक सेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी या दुहेरी यशाबद्दल डॉ. अनिल आर. खुजे यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
