Sunday, September 27, 2026
HomeMLAकामगार बंधूंसोबत ‘मन की बात’चा संवाद

कामगार बंधूंसोबत ‘मन की बात’चा संवाद

चंद्रपूर :- भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने मा. आ. श्री. किशोरभाऊ जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांच्या संकल्पनेतून ‘मन की बात – कामगार बंधुओं के साथ’ या विशेष उपक्रमाचे आयोजन रविवार, दि. 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता भाजप महानगर कार्यालय, गांधी चौक, चंद्रपूर येथे करण्यात आले. Man Ki Baat – With Kamgar Bandhu

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रवादी विचारांचे प्रणेते व एकात्म मानववादाचे जनक पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या राष्ट्रसेवा, अंत्योदय आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्याच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.

यानंतर पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी PM Narendra Modi यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे कामगार बांधवांसोबत सामूहिक श्रवण करण्यात आले. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

देशाच्या विकासात आणि राष्ट्रनिर्माणात कामगार वर्गाचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कामगारांच्या कष्ट, समर्पण आणि योगदानाचा सन्मान करण्यासोबतच त्यांच्या प्रश्नांवर संवाद साधणे व शासनाच्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी भाजप महानगर महामंत्री रविंद्र गुरनुले, बाबुपेठ मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, विधानसभा समन्वयक प्रवीण गिलबिले, तुकूम मंडळ महामंत्री तथा कामगार नेते राकेश नाकाडे, गौरव जोरगेवार, कामगार संघटक बंडू जुमनाके, चंद्रशेखर निमगडे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने कामगार बांधव उपस्थित होते.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाच्या विचारांना अभिवादन करत ‘मन की बात’च्या माध्यमातून कामगार बांधवांशी संवाद साधणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular