Saturday, January 24, 2026
HomeAgricultureबैलजोडी शंकरपट हा शेतकऱ्यांकरिता आनंददायी महोत्सव - हंसराज अहीर

बैलजोडी शंकरपट हा शेतकऱ्यांकरिता आनंददायी महोत्सव – हंसराज अहीर

Bullock Jodi Shankarpat is a joyous festival for farmers – Hansraj Ahir

चंद्रपूर- शेतीमध्ये वर्षभर काबाडकष्ट उपसणाऱ्या देशाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाकरिता शंकरपट हा आनंद, उत्साह व विरंगुळ्याचा महोत्सव असून हा उत्सव ग्रामिण जनतेकरिता महत्वपूर्ण अशा मनोरंजनाचे साधन असल्याने या शंकरपटावरील बंदी हटवून न्यायालयाने शेतकऱ्यांचा सन्मानच केला असल्याचे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir यांनी प्रतिपादीत केले.

कोरपना तालुक्यातील कवठाळा येथे दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित बैलजोडी जंगी इनामी शंकरपटाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारने शेतकरी हिताच्या अनेक महत्वाकांक्षी योजनांवर भर देवून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न चालविला असून या शेतकरीभिमुख योजनांचा प्रत्येक शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन सुध्दा अहीर यांनी याप्रसंगी केले. या कार्यक्रमात आयोजकांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून अहीर यांचे यथोचित स्वागत केले.

या कार्यक्रमास सहउद्घाटक म्हणून कवठाळ्याच्या सरपंच्या सौ. रूपालीताई बोबडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष युवा उद्योजक निलेश ताजने, चंद्रपूर मनपाचे माजी उपमहापौर अनिल फुलझले, भाजपा किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष राजुभाऊ घरोटे, नांदगावचे उपसरपंच संजय चौधरी, जिनिंगचे प्रोप्रा हंसराज चौधरी व अन्य मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. Agricultural Festival Shankarpat

श्री. निलेश ताजने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या शंकरपटाच्या आयोजनांमागील भुमिका विषद करून या कार्यक्रमाच्या आयोजन व यशस्वीतेकरिता योगदान दिलेल्या सर्वांचे आभार मानले. हंसराज अहीर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून या शंकरपट कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular