Seminar on ‘Role of Cultural Diversity in Teaching and Learning Process’ held at Sharadrao Pawar College
चंद्रपूर :- शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर येथे महाविद्यालयाचे गुणवत्ता हमी कक्ष,राज्यशास्त्र आणि इतिहास विभागाच्या वतीने आयोजित “शिक्षण आणि शिक्षण प्रक्रियेत सांस्कृतिक विविधतेची भूमिका”या विषयावर विध्यार्थ्यांकरिता एकदिवसीय चर्चासत्र प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंग यांचे मागदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. Seminar on ‘Role of Cultural Diversity in Teaching and Learning Process’
या चर्चासत्राचे अध्यक्ष म्हणून गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.संजय गोरे तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून गोंडवाना विद्यापीठ इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शेंडे आणि राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद् मुद्दमवार , चर्चासत्राचे आयोजक डॉ .शरद बेलोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी चर्चासत्राचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे यांनी शिक्षण प्रक्रियेतील सांस्कृतिक विविधतेमुळे विद्यार्थ्यांना जगाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन प्राप्त होत असल्याचे प्रतिपादित करून सांस्कृतिक विविधतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सहिष्णुता आणि सर्जनशीलता वाढीस लागत असल्याचे ते म्हणाले.
यावेळी तज्ञ मार्गदर्शक डॉ.प्रकाश शेंडे यांनी रूढी परंपरा, बोलीभाषा हे संवादाचे प्रभावी माध्यम असून यामुळे सांस्कृतिक देवाण-घेवाण होते आणि विद्यार्थी विविध संस्कृतीचा आदर करण्यास शिकतात. यावेळी डॉ. राजेंद्र मुद्दमवार यांनी शिक्षण प्रक्रियेवर भर देत शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या संस्कृतीबद्दल अधिक जाणीव होते त्यामुळे ते विविध संस्कृतीचा अभिमान बाळगतात असे प्रतिपादन केले. यावेळी डॉ. शरद बेलोरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात चर्चासत्राच्या आयोजनाची भूमिका विशद करून शिक्षण प्रक्रियेतील सांस्कृतिक विविधतेमुळे सामाजिक बदल होत असल्याचे प्रतिपादित केले
यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आभार रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. शरद बेलोरकर यांनी केले
