Selling drugs in Chandrapur
6.470 grams MD. A detainee with
चंद्रपूर :- चंद्रपुर जिल्ह्यात अवैध ड्रग्सची विक्री करणाऱ्या इसमाकडून स्थानिक गुन्हे शाखेने 6,470 ग्रॅम एम.डी. (मेफोड्रॉन) पावडर जप्त करीत एका आरोपीला स्थानिक वरोरा नाका चौकातून अटक केली. MD (Mephodrone) powder seized
चंद्रपुर जिल्ह्यामध्ये पोलीस अधिक्षक, मुमक्का सुदर्शन, रिना जनबंधु, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध ड्रग्स, मद्य विक्री करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर पोलीसांच्या वतीने चालु आहे. त्याच मोहीमेच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी LCB स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले असून सदर पथकाच्या माध्यमातुन मोठ्याप्रमाणात अवैधरित्या ड्रग्स ची विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम सुरु आहे. Chandrapur Local Crime Branch
आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहिती मिळाली की, इसम मोहमद अहमद सिददकी अन्सारी, रा. हनुमान मंदिर जवळ, तुकुम तलाव, चंद्रपूर हा MD एम.डी. (मेफोड्रॉन) पावडर घेवून विक्रीकरीता वरोरा नाका पुलीया जवळ चंद्रपुर येथे येणार आहे.
या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना होवून वरोरा नाका पुलाचे खाली दबा धरून बसून मिळालेल्या माहिती मधील इसम येताच त्याचेवर मोठ्या शिताफीने Police Raid छापा टाकून त्यास ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याचेजवळ 6.470 ग्रॅम एम.डी. (मेफोड्रॉन) पावडर किंमत 19,410 रूपये, तसेच सदर एमडी पावडर शरीरात घेणेकरीता आवश्यक असलेले इंजेक्शन सिरीन किंमत 100 रुपये असा एकुण 19510 रुपयांचा मुद्देमाल आढळून आल्याने आरोपी विरूद्ध कलम 8 (क), 21 (ब), एन.डी.पी.एस. अन्वये रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. मधुकर सामलवार, नापोअं. संतोष येलपुलवार, पोशि. किशोर वकाटे, गोपीनाथ नरोटे, अमोल सावे, शशांक बदामवार, मिलींद टेकाम, उमेश रोडे, वैभव पत्तीवार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर चे पथक यांनी केली आहे.