Sunday, April 19, 2026
HomeAccidentबागला चौक ते इंजिनिअरिंग कॉलेज मार्ग दुरुस्ती करा

बागला चौक ते इंजिनिअरिंग कॉलेज मार्ग दुरुस्ती करा

Repair the road from Bagla Chowk to Engineering College before Diwali

चंद्रपूर :- बागला चौक (शहीद हेमंत करकरे चौक) ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंतच्या रस्त्याचे काम मागील अनेक महिन्यांपासून अर्धवट स्थितीत असून नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते तसेच पायदळ नागरिकांचाही वावर असल्याने रस्त्याची खराब अवस्था ही गंभीर अपघातास कारणीभूत ठरू शकते, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. Repair the road from Bagla Chowk to Engineering College before Diwali चंद्रपूर वाचवा -पोलिसांना निवेदन

या निष्क्रियतेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रपूर महानगरपालिका व संबंधित कंत्राटदार यांनी रस्त्याचे बांधकाम जाणीवपूर्वक रखडवून ठेवले असल्याचा आरोप मनसेने केला असून, दि. १६ ऑक्टोबर २०२५ पूर्वी काम पुन्हा सुरू झाले नाही तर मनसेतर्फे महानगरपालिकेसमोर खळखट्याळ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. ५ दिवसांचे मनपाला अल्टिमेटम अन्यथा ‘गिट्टी फेक’ आंदोलन

या संदर्भात तक्रार निवेदन मनोज तांबेकर, जिल्हाध्यक्ष (मनसे रोजगार स्वयमरोजगार) यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेला सादर करण्यात आले.

या वेळी वर्षाताई भोमले (महिला शहराध्यक्ष), संदीप पटेल (शहर संघटक), मंदाताई कराळे (महिला शहर उपाध्यक्ष), ऐकनाथ कराळे यांच्यासह अन्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular