Sunday, April 19, 2026
HomeMNC Chandrapurमनपा कंत्राटी कामगार ४ महिन्यांपासून वेतनविना

मनपा कंत्राटी कामगार ४ महिन्यांपासून वेतनविना

Municipal contract workers without pay for 4 months

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या Chandrapur MNC डम्पिंग यार्ड Dumping Yard येथे कचरा वर्गीकरणाचे काम करणारे कंत्राटी कामगार मागील चार महिन्यांपासून वेतनविना आहेत. दसऱ्याच्या सणादरम्यानही त्यांना पगार मिळाला नाही, त्यामुळे आता दिवाळीपूर्वी वेतन मिळावे या मागणीसाठी हे कामगार मनपा कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. Municipal contract workers without pay for 4 months

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची मनपा प्रशासन आणि संबंधित कंत्राटदाराकडून अजूनही कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.

मनपा अंतर्गत मे. विश्वेश हायड्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत कार्यरत एकूण २८ कामगार (बहुसंख्य महिला) डम्पिंग यार्ड येथे कचरा वर्गीकरणाचे काम करतात. मात्र, कंपनीकडून गेल्या चार महिन्यांचे वेतन थकवण्यात आले आहे. दसऱ्याच्या सणादरम्यानही पगार मिळाला नाही, त्यामुळे कामगार संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेच्या माध्यमातून आता दिवाळीपूर्वी वेतन मिळावे या मागणीसाठी सकाळी डम्पिंग यार्ड येथे आपले काम करून संध्याकाळी ५ नंतर मनपा समोर आंदोलन करत आहेत. “साहेब – लक्ष कुठे आहे” या आशयाने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करीत आहेत.

आंदोलनकर्त्या कामगारांचे म्हणणे आहे की, “आमची दिवाळी अंधारात गेली तर मनपा अधिकाऱ्यांचीही दिवाळी अंधारमय करणार,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

सदर आंदोलन संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेच्या नेतृत्वात कामगारांच्या मागणीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी मनपा प्रशासनाकडे केली आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular