Repair life-threatening roads or else ‘ballast throwing’ protest
चंद्रपूर :- शहरातील रस्त्यांच्या दयनीय आणि जीवघेण्या अवस्थेवरून चंद्रपूर शहर महानगरपालिका (मनपा) प्रशासनाला तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी मनपा आयुक्तांना थेट ५ (पाच) दिवसांचे ‘अल्टिमेटम’ दिले असून , या निर्धारित वेळेत काम न झाल्यास, मनपाच्या निष्क्रियते विरोधात महानगरपालिकेच्या प्रांगणातच “गिट्टी फेक” आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. Repair life-threatening roads or else ‘ballast throwing’ protest
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रामध्ये मध्ये रस्त्यांच्या दुरावस्थेवर प्रकाश टाकला आहे. चंद्रपूर शहरातील मुख्य रस्त्यांपासून अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे, उखडलेला डांबर आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्त्यांवरून ये-जा करणे आता नागरिकांसाठी मोठी अडचण आणि ‘जीवघेणी बाब’ बनली आहे. विद्यार्थ्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, रस्त्यांवर अपघात झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तात्काळ रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मनपा आयुक्तांना स्पष्टपणे कळवले आहे की, चंद्रपूर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती ५ दिवसांच्या आत पूर्ण न झाल्यास, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निष्क्रियेते चा तीव्र निषेध करण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रांगणात ‘गिट्टी फेक’ आंदोलन सुरू करण्यात येईल.असा इशारा त्यांनी दिला आहे.



