Aam Aadmi Party pays tribute to the potholes
चंद्रपूर :- शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या बाबूपेठ परिसरातील दलीत वस्ती म्हणून ओळखला जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर प्रभाग या ठिकाणी मलनिसारण योजनेच्या अंतर्गत सुरू असलेले काम अत्यंत हलक्या दर्जाचे व निष्कृष्ट पद्धतीने केले जात असल्याची तीव्र प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. Potholes on Babupeth road
या योजनेमुळे संपूर्ण रस्ते खड्ड्यांनी भरले असून नागरिकांना अत्यंत गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. पावसाळ्याच्या काळात हे खड्डे पाण्याखाली जाऊन अधिक धोकादायक ठरत आहेत. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही महानगरपालिका प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. Aam Aadmi Party pays tribute to the potholes
आज या अन्यायकारक आणि बेजबाबदार वागणुकी विरोधात AAP आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष श्री. राजू कुडे यांच्या नेतृत्वात नागरिकांना सोबत घेऊन खड्ड्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या अनोख्या आंदोलनाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या मनातील संताप व्यक्त केला.
खड्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी आपच्या वतीने करण्यात आली.




