Cancel the no objection certificate of the country liquor shop immediately, otherwise the villagers of Korapana will go on an indefinite hunger strike
चंद्रपूर :- जिल्ह्यातील तालुका असलेल्या कोरपना येथील वॉर्ड क्रमांक २ मधील देशी दारू दुकानासाठी नगरपालिका प्रशासना ने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. परंतु ज्या जागेवर हे दुकान उभारले जात आहे तो परिसर निवासी आहे. नगरपालिका प्रशासनाने परिसरातील नागरिकांना अंधारात ठेवून हे ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. स्थानिक नागरिक नगरपालिका प्रशासनाने दुकानाला दिलेल्या पत्राचा आणि मंजुरीचा तीव्र विरोध करत आहेत. या संदर्भात शुक्रवारी जिल्हा दंडाधिकारी आणि उत्पादन शुल्क विभागाला पत्र देऊन देशी दारू दुकानाला विरोध दर्शविला आहे. दारू दुकानाला परवानगी नाकारावी अन्यथा स्थानिक नागरिकांसह बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा आयोजित पत्रपरिषदेत अमोल रासेकर यांनी दिला. Cancel the no objection certificate of the country liquor shop
पत्रपरिषदेत रासेकर म्हणाले की, कोरपना शहरात 1992 पासून देशी दारूमुक्त करण्यासाठी कोरपना ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा प्रस्ताव घेऊन देशी दारू दुकान बंद केले. त्यानंतर 2012 मध्ये खोब्रागडे यांनी सरकारी देशी दारू दुकानासाठी ना हरकत पत्र दिले होते. त्यावेळीही परिसरातील नागरिकांनी विरोध केला होता. 2022 मध्ये नगर पंचायतीने एका दुकानाला ना हरकत पत्र दिले होते. आणि आता 28 मे रोजी प्रेम लिकर प्रायव्हेट लिमिटेडने नगरपालिकेने देशी दारू दुकानाला दिलेल्या ना हरकत पत्रामुळे गावात नाराजी आहे. हे दुकान निवासी परीसरात सुरू होत आहे. त्यामुळे वसाहतीतील सामान्य नागरिकांना मद्यपींच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.
यामुळे आज शुक्रवार रोज 4 जुलै रोजी परिसरातील महिला आणि पुरुषांनी एकत्र येऊन जिल्हा दंडाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांची भेट घेतली आणि दुकानाला दिलेला ना हरकत पत्र रद्द करण्याची मागणी केली. ना-हरकत प्रमाणपत्र रद्द न केल्यास कोरपना नगर पालिके समोर बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल असा इशारा अमोल रासेकर आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत मोहब्बत खान, अमोल रासेकर, प्रभाकर मोहितकर, पद्माकर मोहितकर, भानुपात्रा मोहितकर, सुनील बावणे आदी उपस्थित होते.
