Monday, November 17, 2025
HomeIndustrialपालगाव वासियांचा रस्ता पोहोचला आमदाराच्या दरबारी

पालगाव वासियांचा रस्ता पोहोचला आमदाराच्या दरबारी

Palgaon residents’ demands accepted, sit-in protest called off

कोरपना :- मागील 40 वर्षभरापासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनी UltraTech Cement Company Awalpaur परिसराच्या योजनेमध्ये येणाऱ्या पालगाव रस्त्याच्या मागणी करिता बाखर्डी, पालगाव चे सरपंच अरुण रागीट यांच्या नेतृत्वात गावातील शेकडो महिला आणि पुरुषांच्या उपस्थितीत व्यवस्थापनाच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात झाली, संपूर्ण दिवस उलटूनही व्यवस्थापनाचा कोणताही अधिकारी चर्चेकरिता न आल्यामुळे पालगाव वासियामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला व सायंकाळच्या सुमारास संपूर्ण आंदोलनकर्त्यांनी नांदा फाटा येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ आंदोलनात सुरुवात केली.

आंदोलनाची माहिती देवराव भोंगळे यांना लागताच ते आंदोलन स्थळी दाखल झाले व पालगाव वासियांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी झाले, ज्यामुळे आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त होऊन मुख्य प्रवेशद्वार बंद करत वाहतूक रोखण्यात आली.

या दरम्यान गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी कदम यांनी मध्यस्थी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र तोडगा निघू शकला नाही, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे नेतृत्वात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

शेवटी दुसऱ्या दिवशी मंगळवारी सुद्धा हजारोंच्या संख्येत महिलांच्या समवेत आंदोलन कर्ते मुख्य प्रवेशद्वाराजवळ गोळा झाली, सिमेंट प्रशासन नरमले आमदाराच्या उपस्थितीमुळे कंपनी व्यवस्थापनाचे मुख्याधिकारी पी एस श्रीराम, अल्ट्राटेक माणिकगड चे मुख्याधिकारी गहलोत, उपविभागीय दंडाधिकारी रवींद्र कुमार माने पोलीस उपविभागीय अधिकारी आवलपूर समवेत असलेले अनेक पदाधिकारी यांच्यात भर पावसामध्ये अनेकदा चर्चा झाल्या मात्र तोडगा काही निघेना.

शेवटी सायंकाळच्या सुमारास कंपनी प्रशासनाच्या माध्यमातून रस्त्याच्या पूर्तते संदर्भात लिखित आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. Palgaon residents’ demands accepted, sit-in protest called off

यावेळी रस्त्याच्या मागणी संदर्भात भाजपा तालुका अध्यक्ष संजय मुसळे, सरपंच संघटनेचे पदाधिकारी रत्नाकर चटप, अरुण काळे, बाळकृष्ण काकडे, सामाजिक कार्यकर्ते पवनदीप यादव, पुरुषोत्तम निवड, शैलेश लोखंडे, भाजपा पदाधिकारी सतीश उपलेंचेवार, आशिष ताजने, संजय नीत, अरुण भाऊ डोहे, शेकडो पालगाव निवासी व असंख्य अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे कामगार उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular