Thursday, April 2, 2026
HomeMaharashtraखनिज उत्खननातील ओव्हरबर्डनचा वापर रस्ते व विकासकामांसाठी व्हावा

खनिज उत्खननातील ओव्हरबर्डनचा वापर रस्ते व विकासकामांसाठी व्हावा

Overburden from mineral extraction should be used for roads and development works

चंद्रपूर :- खनिज उत्खननादरम्यान निर्माण होणाऱ्या उपसा मातीचा (ओव्हरबर्डन) प्रभावी वापर करण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करून ओव्हरबर्डन डंपिंगचे अंतर ५ किलोमीटरवरून १० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात यावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे Revenue Minister Chandrashekhar Bawankule यांची मुबंई मंत्रालयात भेट घेत केली आहे. Overburden from mineral extraction should be used for roads and development works

राज्यात कोळसा, लोह, बॉक्साईट, मॅगनीज, चुनखडक आदी खनिजांचे उत्खनन प्रामुख्याने ओपन कास्ट पद्धतीने होत असून त्यादरम्यान मोठ्या प्रमाणावर ओव्हरबर्डन बाहेर पडते. सध्याच्या धोरणानुसार, हे ओव्हरबर्डन केवळ ५ किमी परिघात डंप करण्याची मुभा आहे. त्यामुळे खाणी परिसरात प्रचंड प्रमाणात मातीचे ढिगारे साचतात, त्यामुळे रस्ते, नाले व स्थानिक मार्गांवर माती पसरते, नद्यांचे पात्र उथळ होतात आणि पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढत असल्याचे आमदार जोरगेवार यांनी निवेदनात नमूद केले आहे.

ओव्हरबर्डनचा वापर शहर व गावातील खड्डेमय रस्ते बुजविणे, शेत पांदन रस्ते व इतर विकासकामांसाठी करता येणे शक्य आहे. या ओव्हरबर्डनचा वापर करून जलसाठे, सखल भूभाग यांचे भरण करून पूरनियंत्रणास मदत होईल. यामुळे संसाधनांचा पुनर्वापर करत पर्यावरण संरक्षण करता येईल असेही त्यांनी म्हटले आहे.

खनिज उत्खनन करणाऱ्या कंपन्यांनी ओव्हरबर्डन वाहतुकीची जबाबदारी स्वीकारून आवश्यक त्या ठिकाणी पोहोचवावे, अशी तरतूद धोरणात स्पष्टपणे नमूद करण्याचीही मागणी आमदार जोरगेवार यांनी यावेळी ना. चंद्रशेखर बावणकुळे यांना केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular