Navratri rally causes major changes in traffic in Chandrapur city
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात दरवर्षी प्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव निमित्ताने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीदरम्यान शहरातील प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिस प्रशासनाने वाहतूक बंदोबस्तात बदल जाहीर केले आहेत. Changes in traffic in Chandrapur city on the occasion of Navratri rally एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
➡️ बंद राहणारा मार्ग
रॅलीचा मार्ग माता महाकाली मंदिर – गिरणार चौक- गांधी चौक – जटपुरा गेट – मौलाना चौक – गिरणार चौक – माता महाकाली मंदिर असा निश्चित करण्यात आला आहे. हा संपूर्ण मार्ग रॅली दरम्यान वाहतुकीस बंद राहणार असून, नो पार्किंग झोन व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील वाहन धारकांनी रॅली दरम्यान वाहने उभी ठेवू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. धारदार शस्त्रांसह युवकाला चंद्रपूर शहर पोलिसांची अटक
➡️ पर्यायी मार्गांची सोय
वाहन धारक व नागरिकांना अडचण होऊ नये यासाठी पोलिसांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत
१) बल्हारशाहकडून येणारे तसेच बाबुपेठ, बागला चौक, महाकाली वार्ड, भिवापूर वार्डातील नागरिक
शहरात जाण्यासाठी : राजीव गांधी इंजिनीअरिंग कॉलेज- लालपेठ – एरिया हॉस्पिटल – पठाणपुरा मार्ग
हा मार्ग फक्त मोटारसायकल व ऑटो रिक्षाकरिता खुला असेल.
शहराबाहेर इतरत्र जाणाऱ्यांनी कामगार चौक- बल्लारपूर – चंद्रपूर बायपास रोड वापरावा.
२) नागपूर व मुल कडून पंचशील चौक, श्री टॉकीज चौक, पठाणपुरा परिसराकडे जाणारे नागरिक (जड वाहने वगळून)
वरोरा नाका–मित्रनगर चौक- ज्येष्ठ नागरिक भवन– संत केवलराम चौक–विदर्भ हाऊसिंग चौक– बिनबा गेट मार्गाचा वापर करावा.
३) नागपूर व मुल कडून रामाळा तलाव, बगड खिडकी, गंज वार्ड, भानापेट वार्ड परिसराकडे जाणारे नागरिक (जड वाहने वगळून)
सावरकर चौक–बसस्टँड चौक–आरटीओ ऑफिस–रयतवारी कॉलरी मार्गाचा वापर करावा.
➡️ जड वाहनांसाठी निर्बंध
वरील पर्यायी मार्गांवर जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे अशा वाहनचालकांनी पूर्वतयारी करून पर्यायी बाह्य मार्गांचा वापर करावा.
चंद्रपूर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (भापोसे) यांनी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, नवरात्र उत्सवाच्या रॅली दरम्यान शहरातील वाहतुकीत कुठलाही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सर्व नागरिकांनी व वाहन धारकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. रॅली दरम्यान शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरण राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.