MP Dhanorkar drew the attention of the central government through various questions in the Lok Sabha
चंद्रपूर :- 25 नोव्हेंबर पासून लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून चंद्रपूर- वणी- आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून केंद्र सरकार ला धारेवर धरले आहे.
लोकसभेच्या दिल्ली येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विविध प्रश्नांच्या माध्यमातून सर्व सामान्यांचे प्रश्न अधिवेशनात मांडले. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना तात्काळ विज उपलब्ध करुन देण्याच्या संदर्भात सरकारची काय योजना आहे, या संदर्भात विचारना करण्यात आली. त्यासोबतच महिला सुरक्षेच्या संदर्भांने राष्ट्रीय महिला आयोगाने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांसदर्भात केलेल्या उपाययोजना संदर्भात प्रश्नाद्वारे खासदार धानोरकर यांनी सरकाराला विचारणा केली.