Teacher MLA Sudhakar Adbale’s visit to Borda School
The success achieved by the Board School is commendable – MLA Sudhakar Adbale
चंद्रपूर :- बोर्डा शाळेतील नयनरम्य परिसर,उत्कृष्ट रंगरंगोटी, सुंदर परसबाग, बाला पेंटिंग्ज,वृक्षारोपण व संवर्धन,परिसर स्वच्छता,बोलक्या भिंती,प्रेरणादायी वाचनकुटी,वर्गसजावट,स्वच्छतेविषयीचे संदेश,शालेय परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे, यांचेसह अल्पावधीतच बोर्डा शाळेनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत मिळविलेले यश कौतुकास्पद असल्याचे मत शिक्षक आमदार सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale यांनी व्यक्त केले. Teacher MLA Sudhakar Adbale’s visit to Borda School
चंद्रपूर पंचायत समितीमधील जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा बोर्डा येथे आमदार सुधाकर अडबाले यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
शाळेच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या सर्व शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ यासोबतच योग्य मार्गदर्शन करणारे गटशिक्षणाधिकारी निवास कांबळे आणि शिक्षण विस्तार अधिकारी धनपाल फटिंग यांचेही कौतुक केले. शाळेला ई-लर्निंग संच देणार असल्याचेही सांगितले.
यावेळी विद्यार्थी आणि शिक्षक यांचेशिही संवाद साधला. यावेळी गटशिक्षणाधिकारी निवास कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी धनपाल फटिंग, शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत काटकर, शाळा व्य.समितीचे अध्यक्ष प्रमोद डोर्लिकर, सदस्य गौतम सागौरे, प्रिती तावाडे, शारदा सिडाम, सोनी मांदाळे, सविता नैताम यांचेसह शाळेतील शिक्षक राहूल गंधारे, निरंजना पोटे, ऊषा डोहे, ज्योती खरकाटे यांचेसह शिक्षक संघटनेचे विजय भोगेकर, जे.डी.पोटे, प्रा.रवी झाडे, विलास गौरकर आदिंची उपस्थिती होती.
मुख्याध्यापक कातकर यांनी शाळेमध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.संचलन राहूल गंधारे यांनी तर सर्वांचे आभार प्रशांत काटकर यांनी मानले.
बोर्डा नंतर लगेच मागील वर्षी स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धेत जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविलेल्या वलनी शाळेला सुद्धा आमदार सुधाकर अडबाले यांनी भेट देऊन या सुंदर शाळेचे आणि मुख्याध्यापिका कल्पना विरमलवार यांच्या कार्याचे कौतुक केले.