Inauguration of Bhau’s Dandiya on 3rd October
चंद्रपूर :- मराठा चॅरीटेबल ट्रस्ट तथा बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवारातर्फे स्व बाळूभाऊ धानोरकर Late MP Balu Bhau Dhanorkar यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य अशा दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. खासदार प्रतिभाताई धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांच्या आयोजनात दरवर्षी दांडीया महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. सदर दांडिया हा विदर्भातील सर्वात मोठा दांडिया म्हणून प्रसिध्द आहे.
दि. 03 ऑक्टोंबर ते 12 ऑक्टोंबर 2024 पर्यंत भाऊच्या दांडीयाचे आयोजन क्लब ग्राऊंड चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही चांदा क्लब ग्राऊंड, चंद्रपूर येथे दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. युवा वर्गासाठी ही मोठी पर्वणी असून या महोत्सवात आयोजकांतर्फे गाडी, स्कुटर त्यासोबतच लाखो रुपयांचे रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. प्रेक्षकांना देखील रोज पारितोषिक जिंकण्याची संधी मिळणार आहे.