Friday, April 17, 2026
HomeEducationalशिक्षकांना लाभापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी, निलंबनाची मागणी करणार

शिक्षकांना लाभापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी, निलंबनाची मागणी करणार

MLA Sudhakar Adbale visits grand symbolic sit-in protest against Zilla Parishad Education Department policy

चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना चंद्रपूरच्या वतीने आज दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी जिल्हा परिषद चंद्रपूर समोर जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा अकार्यक्षम कारभार तथा अडेलतट्टु धोरणाविरोधात भव्य लाक्षणिक धरणे आंदोलनास आमदार सुधाकर अडबाले MLA Sudhakar Adbale यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. Maharashtra State Primary Teachers Central Association’s symbolic sit-in protest

चंद्रपूर जिल्ह्यात ६३ कोटी रुपये एकस्तर वेतन श्रेणी व १५ टक्के प्रोत्साहन भत्ता थकबाकी देयके अदा करण्यासाठी आले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे निधी परत गेला. यामुळे ३२५४ शिक्षकांना लाभापासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबित करण्याची मागणी सभागृहात लावून धरणार असल्याचे आमदार सुधाकर अडबाले यांनी यावेळी बोलतांना सांगितले. तसेच प्राथमिक शिक्षकांच्या इतर समस्यांवर मार्गदर्शन केले.

आंदोलनाला समन्वय समितीचे चानकुमार खोब्रागडे, उमाजी कोडापे, विपीन धाबेकर, राजू लांजेकर, अशोक राऊत, प्रदीप पावडे, विजय भोगेकर, सुनील दुधे, पुरुषोत्तम गंधारे, मारोतराव रायपूरे, प्रकाश चुनारकर, श्याम लेडे, हरीश ससनकर, अमोल देठे, अविनाश जुमडे, अलका ठाकरे, पदाधिकारी, सदस्य व जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular