चंद्रपूर :- महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत आज नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात चंद्रपूर येथे स्थानिक लोकाधिकार सेनेच्या वतीने आयोजित महामोर्चाच्या प्रतिनिधींशी ते संवाद साधणार आहेत. त्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांवर होणाऱ्या या चर्चेकडे लक्ष लागले आहे. Minister for Industries and Marathi Language, Dr. Uday Samant.
दौऱ्याच्या नियोजित कार्यक्रमानुसार, डॉ. सामंत सकाळी ७ वाजता नागपूर येथून मोटारीने चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी ९.३० वाजता त्यांचे चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात आगमन होणार असून त्यानंतर काही काळ राखीव कार्यक्रम आहे.
सकाळी १० वाजता चंद्रपूर शहरात चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक लोकाधिकार सेना आयोजित महामोर्चाच्या प्रतिनिधींसोबत डॉ. सामंत संवाद साधणार आहेत. स्थानिक लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष मा. गजानन कीर्तिकर यांच्या संदर्भाने हा संवाद आयोजित करण्यात आला आहे.
चंद्रपूर व गडचिरोली परिसरातील स्थानिक नागरिक, कामगार तसेच विविध घटकांशी संबंधित प्रश्न आणि मागण्यांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. उद्योगमंत्री म्हणून डॉ. सामंत यांच्यासोबत होणाऱ्या या संवादातून स्थानिक प्रश्नांवर काय भूमिका मांडली जाते, याकडे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
संवाद कार्यक्रम आटोपल्यानंतर डॉ. सामंत सोयीनुसार चंद्रपूरहून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील. त्यानंतर नागपूर येथे आगमन व राखीव कार्यक्रम राहणार आहे.
