Sunday, September 6, 2026
HomePoliticalबाबूपेठ येथे बहुजन समाज पार्टीची शहरस्तरीय बैठक

बाबूपेठ येथे बहुजन समाज पार्टीची शहरस्तरीय बैठक

चंद्रपूर :- आगामी काळातील पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीला गती देण्यासाठी बहुजन समाज पार्टी (BSP) चंद्रपूर शहराच्या वतीने बाबूपेठ येथे शहरस्तरीय बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासह कार्यकर्त्यांना सक्रिय करून जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. BSP holds city-level meeting at Babupeth

यावेळी प्रभाग क्रमांक १७, बाबूपेठच्या सेक्टर अध्यक्षपदी इंजि. अंकित आनंदाराव डेठे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच दादाजी धाकडे यांची BSP शहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे बाबूपेठ परिसरातील पक्ष संघटनेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. focus on strengthening the organization

बैठकीला BSP शहर अध्यक्ष इंजि. विमित कोसे, शहर महासचिव कार्तिक वानकर, शहर सचिव इंजि. शुभम सागोरे, शैलेशजी खोब्रागडे, बाबूपेठ झोन प्रभारी किशोरभाऊ चिकाटे, कांबळे साहेब तसेच आयुष धाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीदरम्यान पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करणे आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी आगामी काळात प्रभावीपणे आंदोलन व जनसंपर्काच्या माध्यमातून काम करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular