चंद्रपूर :- चंद्रपूरच्या ऐतिहासिक वारशाचे जतन, प्राचीन मंदिरांचे संवर्धन आणि जनहिताच्या विकासकामांना गती देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी पुढाकार घेतला आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाच्या नागपूर मंडळाचे सहाय्यक अधिक्षक पूरातत्व अभियंता मिलिंद व्हि अंगाईतकर यांच्यासह आमदार किशोर जोरगेवार यांनी श्री माता महाकाली मंदिराची पाहणी केली. मंदिराच्या दगडी वास्तूची होत असलेली झीज आणि संवर्धनाची गरज लक्षात घेऊन त्यांनी विभागाचे लक्ष वेधले. यावेळी मंदिराच्या शास्त्रीय पद्धतीने जतनासाठी सर्वसमावेशक योजना तयार करण्यासह चंद्रपूरमधील ऐतिहासिक वारसा आणि जनहिताच्या विकासकामांशी संबंधित मागण्या यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांच्याकडे केल्या आहे. Scientific conservation of the Mahakali Temple
पदवीधर निवडणूक दिवशी मद्यविक्री बंद……
यावेळी सुनिल महाकाले, श्री महाकाली माता महोत्सव समीतीचे मिलिंद गंपावार, नामदेव डाहुले, मनपा गटनेते शेखर शेट्टी, विनोद खेवले, आशिष मासिरकर आदींची उपस्थिती होती.
समतानगर येथे रामनगर पोलिसांचा छापा Police Raid……
गोंड राजवंशाच्या काळात १६ व्या शतकात उभारण्यात आलेले श्री माता महाकाली मंदिर हे चंद्रपूरच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ओळखीचे महत्त्वपूर्ण प्रतीक आहे. देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी होत असते, तर नवरात्रोत्सवात येथे भाविकांचा मोठा ओघ असतो. मात्र, काळाच्या ओघात आणि हवामानाच्या परिणामामुळे मंदिराच्या दगडी वास्तूची झीज होत असल्याने तिचे मूळ स्वरूप कायम ठेवून शास्त्रीय पद्धतीने संवर्धन करणे आवश्यक आहे. मंदिराच्या सूक्ष्म कलाकृतींना कोणतीही हानी न पोहोचवता रासायनिक स्वच्छता आणि संरक्षणात्मक उपचार करण्यासाठी सर्वसमावेशक जतन योजना तयार करून तिला मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी केली.
चंद्रपूरच्या ऐतिहासिक वास्तूंचे सौंदर्य आणि पर्यटनक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या संरक्षणाखालील मंदिरांवर आणि स्मारकांवर सजावटीची प्रकाशयोजना करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली. ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत अंचलेश्वर मंदिरावर करण्यात आलेल्या आकर्षक प्रकाशयोजनेच्या धर्तीवर इतर संरक्षित वास्तूंवरही प्रकाशयोजना केल्यास त्यांचे वास्तुशिल्पीय सौंदर्य अधिक उठून दिसेल. यामुळे चंद्रपूरच्या ऐतिहासिक वैभवाला नवी ओळख मिळण्यासोबतच पर्यटनालाही चालना मिळू शकते, अशी भूमिका त्यांनी मांडली.
चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या जीर्ण इमारतीचे आधुनिक तंत्रज्ञानातून नूतनीकरण, राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयामागील व्यायामशाळेच्या बांधकामासाठी परवानगी आणि धानोरा येथील प्राचीन मंदिरांच्या संरक्षणासह जीर्णोद्धाराची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी निवेदनातून केली. तसेच मंदिर परिसरातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने समन्वयातून कार्यवाही करावी, अशी विनंती केली.
चंद्रपूरचा ऐतिहासिक वारसा जपताना नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि विकासाशी संबंधित कामेही मार्गी लागली पाहिजेत, ही भूमिका या निवेदनातून मांडण्यात आली आहे. श्री माता महाकाली मंदिराच्या संवर्धनापासून ऐतिहासिक स्मारकांवरील प्रकाशयोजना, पोलीस ठाण्याच्या इमारतीचे नूतनीकरण, व्यायाम शाळेची उभारणी आणि धानोरा येथील प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धारापर्यंतच्या पाचही विषयांवर पुरातत्त्व विभागाने सकारात्मक आणि कालबद्ध कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
