Medical students deprived due to errors on the Freeship portal
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या निवेदनानुसार सन २०२३-२४ मध्ये शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर किंवा इतरत्र B.A.M.S कोर्स करिता विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. मात्र प्रवेशीत काही विद्यार्थ्यांना सन २०२४-२५ मध्ये राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे NEET द्वारे M.B.B.S कोर्स साठी प्रवेश मिळाला असल्याने त्या विद्यार्थ्यानी B.A.M.S कोर्स सोडून चार वर्षाची ट्यूशन फी व फ्रिशिपची एकुण रक्कम चलनाद्वारे शासनास परत केली आहे. त्यामुळे M.B.B.S कोर्स साठी शासकीय वैद्यकीय महविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी फ्रिशिपची सवलत मिळणेसाठी समाजकल्याण विभागाच्या पोर्टल वर अर्ज करताना अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना M.B.B.S अभ्यासक्रमासाठी फ्रिशिप अर्ज आपलोड करता येत नाही. Medical students deprived due to errors on the Freeship portal
त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अनेक गोर गरीब पालकांना लाखोंची ट्यूशन फी भरावी लागणार असल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे गोर – गरीब होतकरू वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. Former MLA Subhash Dhote demands immediate correction in the portal
त्यामुळे गोरगरीब होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी सदर ऑनलाइन प्रणालीमध्ये तात्काळ सुधारणा करून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फ्रिशिप अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट, प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुणे, आयुक्त ओमप्रकाश बयकोरिया यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.