Saturday, April 26, 2025
HomeAgricultureसोयाबीनवरील विषाणूजन्य हिरवा आणी पिवळा मोझॅक रोगाचे करा व्यवस्थापन - सुशांत लव्हटे...

सोयाबीनवरील विषाणूजन्य हिरवा आणी पिवळा मोझॅक रोगाचे करा व्यवस्थापन – सुशांत लव्हटे उपविभागीय कृषी अधिकारी वरोरा

Manage Viral Green and Yellow Mosaic Disease on Soybean – Sushant Lavhate, Sub Divisional Agriculture Officer Warora

चंद्रपूर :- सोयाबीन पिकावर पिवळ्या मोझॅक (विषाणूजन्य) रोगाचा दरवर्षी कमीअधिक प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो. यावर्षी या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास खालील प्रमाणे लक्षणे ओळखून उपाय योजना कराव्यात असे उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी वरोरा सुशांत लव्हटे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे, तसेच उपविभागातील सर्वच गावात दवंडी च्या माध्यमातून जनजागृती चे कार्य सुरु केले आहे. Manage Viral Green and Yellow Mosaic Disease on Soybean

पिवळया मोझॅक ची लक्षणे (Yellow Mosaic Virus) रोगाच्या सुरवातीला पानावर पिवळया रंगाचे छोटे छोटे चट्टे दिसतात, तदनंतर पानावर चमकदार पिवळया हिरव्या रंगाचे मोठ्या आकारचे चट्टे दिसतात व पाने पिवळ्या रंगात बदलतात. झाडे खुरटी व खुबी राहतात. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोऱ्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः रोगग्रस्त बियाणाद्वारे व दुय्यम प्रसार हा पांढ-या माशीद्वारे होतो.
सोयाबीन मोझॅक विषाणूची लक्षणे (Soybean Mosaic Virus) रोगग्रस्त झाडांची बाढ खुंटलेली दिसते, पाने आखुड, लहान, जाडसर, सुरकुतलेली होतात व पानाच्या कडा खालच्या बाजूने दुमडतात. पानामध्ये अत्याधिक हिरवेपणा दिसतो. पानाचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसुन येतो. रोगग्रस्त झाडाला फुलोरा उशिरा येतो व या फुलोत्यास जास्त शेंगा लागत नाही. रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास बियाण्याच्या आवरणाचा रंग बदलुन करडा तपकिरी काळपट होतो. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः रोगग्रस्त बियाण्याद्वारे होतो व दुय्यम प्रसार हा मावा किडीद्वारे होतो. Agricultural

प्रतिबंधात्मक उपाय काय करावे

सुरुवातीतच रोगग्रस्त झाडे आढळल्यास शेताबाहेर काढुन नष्ट करावे, पिकामधील व बांधावरील तण नियंत्रण अवश्य करावे.

नियंत्रणाचे उपाय

पाढरी माशी व मावा किडीचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी शेतात पिवळे चिकट सापळे १५ × ३० सेमी आकाराचे एकरी २०-२५ या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या समकक्ष उंचीवर लावावे.

पांढरी माशी व मावाव्यवस्थापना करीता या रासायनिक किटकनाशकांची करा फवारणी

किडीच्या इमीडाक्लोप्रीड १७.८ एसएल २.५ मिली किंवा फ्लॉनिकामाईड ५० टक्के डब्लुजी ३ ग्रॉम किंवा थायोमिथोक्शाम २५ टक्के डब्ल्युजी ३ ग्रॉम किंवा अॅसिटेमाप्रिड २५ टक्के + बायफेनथीन २५ डब्लुजी ५ ग्रॉम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. गरज वाटल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. फवारणी करतांना किटकनाशके आलटून पालटून वापरावी, मुख्यता कृषी तज्ञांचा सल्ला घ्यावा असे आवाहन सुशांत लव्हटे उपविभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी वरोरा यांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular