Lord Buddha statue installation and Sariputta Buddha Vihara dedication ceremony at Dongargaon
चंद्रपूर :- भगवान बुद्ध यांच्या पावन पौर्णिमेच्या निमित्ताने सारिपुत्त बौद्ध विहार सेवा समिती डोंगरगाव, ता. मूल, जि. चंद्रपूर यांच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिस्थापना तथा सारिपुत्त बुद्ध विहार लोकार्पण सोहळा तसेच बौद्धिक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १० मे ते ११ मे २०२५ रोजी सारिपुत्त बौद्ध विहार प्रांगण डोंगरगाव येथे करण्यात आले आहे. Lord Buddha statue installation and Sariputta Buddha Vihara dedication ceremony
शनिवार दिनांक १० मे रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बौद्धिक खेळ तर सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक ११ मे रोजी पहिल्या सत्रात सकाळी ८ वाजता समता सैनिक दलाच्या पथसंचलनामध्ये भगवान गौतम बुद्ध मूर्तीची महारॅली काढण्यात येणार आहे सकाळी १० वाजता धम्म धाजरोहण, १०:१५ वाजता सारिपुत्त बौद्ध विहार लोकार्पण सोहळा, १०:३० वाजता भगवान गौतम बुद्ध मूर्तीची प्रतीस्थापना अनावरण तसेच त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पूज्य श्रद्धेय भंते कौंडण्य (महाथेरो), पूज्य श्रद्धेय भंते धम्मराज, पूज्य श्रद्धेय भंते नागसेन, भिक्षूनी श्रद्धेय सुनीता, भिक्षूनी श्रद्धेय कलाबोधी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
दुसऱ्या सत्रात दुपारी 12 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष, सारिपुत्त बुद्ध विहार अध्यक्ष प्रभाकरजी गोवर्धन, उद्घाटक भारतीय बौद्ध महासभाचे चंद्रपूर जिल्हा पूर्व अध्यक्ष डॉ. राजपाल खोब्रागडे तसेच सहउद्घाटक महिला अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा चंद्रपूर जिल्हा यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन होणार आहे.
सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत सहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
तिसऱ्या सत्रात रात्रौ 8 वाजता विजय गुरणुले आणि संच आंबोली यांचा “जलसा भीम क्रांतीसूर्याचा” समाज प्रबोधनात्मक बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या भव्य दिव्य कार्यक्रमाला बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, मूख्य आयोजक सारिपुत्त बौद्ध समाज, भीम गर्जना मित्र मंडळ, पंचशील महिला मंडळ तथा समस्त डोंगरगाव, राजोली, चिखली, गांगलवाडी, भादूर्णा बौद्ध समाज बांधवांनी केली आहे.
