LCB’s Early Morning Raid: 21 Cattle Rescued; Accused Arrested in Illegal Trafficking Case
चंद्रपूर :- चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध गोवंश तस्करीविरोधात मोठी कारवाई करत २१ गोवंशांची सुटका केली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पडोली मार्गे तेलंगणाकडे कत्तलीसाठी क्रूरपणे वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास सापळा रचून ही कारवाई यशस्वी केली. LCB’s Early Morning Raid
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले व त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, दि. २७ एप्रिल रोजी पहाटे सुमारे ५ वाजता रामाळा तलाव परिसरातील रेल्वे फाटकाजवळ संशयित वाहनांवर लक्ष ठेवण्यात आले. यावेळी दोन पिकअप वाहने (क्र. MH 34 BZ 6959 व MH 32 AJ 3442) अडवून तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान १४ गायी व ७ बैल अशा एकूण २१ गोवंशांना अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून नेले जात असल्याचे आढळून आले. प्राण्यांचे पाय व तोंड दोरीने बांधलेले होते. त्यांना पाणी व चाऱ्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. चालकांकडे वाहतुकीसंदर्भातील कोणतीही वैध कागदपत्रे अथवा पशुवैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट झाले. तपासात हे गोवंश गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथून यद्रपूर येथे कत्तलीसाठी नेले जात असल्याचे निष्पन्न झाले. 21 Cattle Rescued; Accused Arrested in Illegal Trafficking Case
या कारवाईत पोलिसांनी सुमारे २४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये दोन पिकअप वाहने (₹२० लाख), २१ गोवंश (₹३.८० लाख) व तीन मोबाईल संच (₹४९ हजार) यांचा समावेश आहे.
या प्रकरणी संतोष रामभाऊ थोरात (वय ५२), ऐजाज असलम बेग (वय ३८) व वसीम नबी कुरेशी (वय ३८, रा. बगळखिडकी वार्ड, चंद्रपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सुटका केलेल्या सर्व गोवंशांना ‘प्यार फाऊंडेशन’, चंद्रपूर येथे वैद्यकीय तपासणीसाठी हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुग्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. सुनिल गौरकार, पोहवा दिपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.