Wednesday, July 8, 2026
HomeEducationalगडचिरोली येथे सहसंचालक कार्यालय निर्मिती होण्याच्या मार्गावर

गडचिरोली येथे सहसंचालक कार्यालय निर्मिती होण्याच्या मार्गावर

Establishment of Joint Director’s Office in Gadchiroli Nears Reality

चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कार्यक्षेत्राकरीता स्वतंत्र सहसंचालक (उच्च शिक्षण) कार्यालयाची निर्मीती करण्यात यावी, अशी मागणी पावसाळी अधिवेशनात अर्धा तास चर्चेद्वारे करण्यात आली. यावर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सहसंचालक कार्यालय स्थापन करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे उत्तरात सांगितले. Joint Director’s Office in Gadchiroli

सन २०११ मध्ये शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूरची विभागणी करुन चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांकरीता स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठाची निर्मीती केली. गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मीतीस जवळपास १५ वर्षाचा काळ झाला. मात्र, अद्यापही सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे स्तरावरील कामकाजाकरीता विद्यापीठीय व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना शेकडो किलोमिटरची पायपीट करावी लागत आहे.

गोंडवाना विद्यापीठाचे कार्यक्षेत्र गडचिरोली जिल्ह्याचे सिरोंचा या राज्याच्या टोकापर्यंत तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम जिवती, कोरपणा या टोकापर्यंत विस्तृत स्वरूपाचे आहे. महाविद्यालयांची सहसंचालक स्तरावरील कार्यालयीन कामे करण्याकरीता संबंधीत कर्मचारी यांना शेकडो किलोमिटरचा त्रासदायक प्रवास करावा लागत आहे. नागपूर येथे एखादे काम घेवून जाणे व ते आटोपून परतने अशा एका फेरीकरीता २-३ दिवसाचा कालावधी लागतो आहे. अशा एखाद्या कामाकरीता कित्येक फेऱ्या कर्मचाऱ्यांना माराव्या लागत असतात. डिजीटल युगात कामे तत्परतेने होणे अपेक्षीत असतांना नुसत्या प्रवासात आणि मोठ्या अंतरामुळे कामे खोळंबतात. तसेच सद्यास्थितीत विभागीय सहसंचालक कार्यालय नागपूर यांचेकडे ३-४ विद्यापीठांचा तसेच नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व वर्धा असा ६ जिल्ह्यांचा व हजारो महाविद्यालयांचा मोठा भार असुन सहसंचालक कार्यालयात कार्यरत कर्मचारी संख्या पुरेशी नसल्यामुळे कोणतीही कामे तत्परतेने होत नाहीत. यामध्ये कर्मचाऱ्यांना बराच नाहक त्रास सहन करावे लागत आहे.

गोंडवाना विद्यापीठाकडे संलग्नीत महाविद्यालये २१८ असून क्षेत्रफळाच्या दृष्टिने अतिशय विस्तृत स्वरूपाचे गोंडवाना विद्यापीठाचे कार्यक्षेत्र आहे.

गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मीतीस १५ वर्षाचा काळ झालेला असून सहसंचालक स्तरावरील कामकाजांकरीता कर्मचाऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे स्वतंत्र सहसंचालक कार्यालयाची निर्मीती करण्याबाबत पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार धीरज लिंगाडे यांनी अर्धा तास चर्चेद्वारे उच्च शिक्षण मंत्र्यांकडे मागणी लावून धरली.

यावेळी उच्च शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील म्हणाले की, आकृतीबंध मंजूर करून वित्त विभागाची परवानगी घेऊन गडचिरोली येथे सहसंचालक कार्यालय सुरू करण्यात येईल. त्यामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची पायपीट थांबणार आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular