चंद्रपूर :- दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने जश्ने-ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत छोटा बाजार चौकात पोहोचली. येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. Jashne-Eid-e – Miladunnabi’s procession grand reception
यावेळी भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष राशिद हुसेन, राजिक खान, इमरान खान, एजाज शेख, सोहेल शेख, जफर बेग, सय्यद अबरार, मोहम्मद साकिब, विजय राउत, तुषार सोम, राकेश बोमनवार, चंद्रशेखर देशमुख, तापोष डे, रामकुमार अक्कापल्लीवार आदींची उपस्थिती होती.
शोभायात्रा छोटा बाजार चौकात पोहोचताच आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी मंचावरून शोभायात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी शोभायात्रेत सहभागी झालेल्या मौलाना तसेच मुस्लिम समाजातील मान्यवरांचा आ. जोरगेवार यांच्या हस्ते शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मुस्लिम बांधवांशी संवाद साधत त्यांनी जश्ने-ईद-ए-मिलादुन्नबीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी ईद-ए-मिलादुन्नबी हा प्रेम, शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र दिवस असल्याचे सांगितले. चंद्रपूर शहराची ओळख सर्वधर्मीयांची एकता, सामाजिक सलोखा आणि परस्पर सन्मानाची आहे असे ते म्हणाले.
