mandatory to have an internal (women) grievance committee in the office
चंद्रपूर :- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 व नियम 9 डिसेंबर 2013 अंतर्गत ज्या आस्थापनेवर दहा किंवा दहापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहे, अशा जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयामध्ये अंतर्गत तक्रार समितीची स्थापन असणे अनिवार्य आहे. internal (women) grievance committee
अंतर्गत तक्रार समितीमध्ये कार्यालयातील वरिष्ठ महिला अध्यक्ष असावी. महिलांच्या प्रश्नांशी बांधील असलेल्या किंवा ज्यांना सामाजिक कार्याचा अनुभव व कायद्याचे ज्ञान आहे, अशा कर्मचाऱ्यांमधून किमान दोन सदस्य तसेच प्रशासकीय संघटना किंवा लैंगिक छळाशी संबंधित प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती यामधील एक सदस्य असावा. समितीमध्ये किमान 50 टक्के सदस्य महिला राहतील व समितीचा कार्यकाळ हा तीन वर्षाचा राहील.
शासन स्तरावर अंतर्गत तक्रार समितीची ऑनलाईन अपडेट करण्याची कार्यवाही सुरू असून त्यासाठी प्रत्येक कार्यालयाने अंतर्गत तक्रार समितीची स्थापना केल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे सादर करणे आवश्यक आहे. सदर माहिती disttdwcdocha@gmail.com किंवा disttwcdo_cha@rediffmail.com यावर सादर करावी. तसेच ज्या कार्यालयात 10 पेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत, अशा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी स्थानिक तक्रार समिती व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे तक्रार नोंदवावी. Protection of women from sexual harassment
सदर अंमलबजावणीत कोणीही कसूर केल्यास 50 हजार रुपयापर्यंत दंडात्मक कार्यवाहीची तरतूद कायद्यात नमूद आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.