Friday, January 17, 2025
HomeAcb Trapइन्फंट येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

इन्फंट येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

Infant Convent Salute to Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar

चंद्रपूर :- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून इयत्ता ९ वी मधील विद्यार्थ्यांनी सकाळच्या परिपाठाचे सादरीकरण केले. या दिवसानिमित्त कु. क्रांती लिहितकर हिने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबाबत माहिती सांगितली.

याप्रसंगी मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौऱ भंगू , मुख्याध्यापक रफिक अन्सारी , स्काऊट मास्टर सुभाष पिंपळकर, शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मधुरा गिरडकर हिने केले व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular