Urgently implement a cleanliness campaign in Chandrapur district
चंद्रपूर :- जिल्ह्यातील विविध तालुके व गावांचा आढावा घेतल्यानंतर असे निर्दशनास आले कि, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली आहे. ग्रामीण भागात सांडपाणी जाणारे नाली तुडूंब भरले असुन यामुळे जिल्ह्यात साथीचे रोग वेगाने पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. डेंग्यू, मलेरिया, तसेच अनेक घातक विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे.
विशेषतः, जिल्ह्यात कार्यरत अनेक मोठ्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात दूषित सांडपाणी, धूळ आणि इतर प्रदूषक घटकांचे उत्सर्जन केले जात आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याची जनमानसात चर्चा आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. implement a cleanliness campaign in Chandrapur district
तरी, आपण तातडीने संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका, ग्रामपंचायत, पंचायत समित्या व नगरपरिषद स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश निर्गमित करून या निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी व झालेल्या कारवाईचा अहवाल लेखी स्वरूपात प्रदान करावा या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांना मनसे जिल्हासचिव किशोर मदगुलवार यांच्या नेतृत्वात देण्यात आले. MNS District Secretary Mr. Kishore Madgulwar’s statement to the District Collector
यावेळी कुलदिप चंदनखेडे जिल्हा उपाध्यक्ष मनविसे, क्रिष्णा गुप्ता रुग्ण मित्र, राजु देवागंन, घनश्याम टिकले, राहुल बेसेकर आदी शिष्टमंडळ उपस्थीत होते.
