Immediately stop the ‘Amma Ki Padhai’ program at Deekshabhoomi
चंद्रपूर :- चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक आणि बौद्ध अनुयायांसाठी अत्यंत श्रद्धास्थान असलेली दिक्षाभूमी सध्या विविध वादग्रस्त घडामोडींमुळे चर्चेत आली आहे. “अम्मा की पढ़ाई” या नावाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सुरु असलेल्या उपक्रमाला अतिक्रमण केल्याचा आरोप करीत दिक्षाभूमी बचाव संघर्ष समितीने आयोजित पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. Immediately stop the ‘Amma Ki Padhai’ program at Deekshabhoomi
दिक्षाभूमी ही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे. या भूमीच्या जडणघडणीत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे मोठे योगदान आहे. त्यांनीच सामाजिक बांधिलकीतून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय सुरू केले.
मात्र अलीकडील काळात या पवित्र स्थळी सौंदर्यीकरणाच्या नावाखाली जागा कमी केली जात आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला. विशेष म्हणजे, महाविद्यालयाच्या जागेवर “अम्मा की पढ़ाई” या नावाने काही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग चालवले जात असून, ते स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी संबंधित असल्याची टीका संघर्ष समितीने केली आहे. या प्रकारामुळे दिक्षाभूमीची गंभीर हानी होत असल्याची भावना या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली.
दिक्षाभूमी बचाव संघर्ष समितीने यावेळी “अम्मा की पढ़ाई” नावाने चालणारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग तात्काळ बंद करावेत, दिक्षाभूमीच्या आत किंवा परिसरात कोणतेही सौंदर्यीकरणाचे काम सुरु करु नये, जेणेकरून भविष्यकाळात जागेची कमतरता जाणवू नये., दिक्षाभूमीस लागून असलेले क्लब ग्राऊंड हे कायमस्वरूपी दिक्षाभूमीला हस्तांतरित करावे. तसेच, विश्रामगृहास “डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक” असे नाव देण्यात यावे., तसेच येणाऱ्या १५ व १६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दिक्षाभूमी समारंभात कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्यांना सहभागी होऊ देऊ नये, कारण हा कार्यक्रम सामाजिक व ऊर्जात्मक स्वरूपाचा असून, राजकीय नाही अशा विविध मागण्या करण्यात आल्या. Dikshabhoomi Rescue Struggle Committee
या पत्रकार परिषदेत अनिल रामटेके, हंसराज वनकर, सुरेश नारनवरे, अशोक मस्के, मृणाल मेश्राम, राजु रामटेके, संतोष डांगे, अमोल जुनघरे, महेन्द्र झाडे, सदानंद चांदेकर, राजु भगत, आनंद शेगोकर, मंगेश गेडाम, शरद वनकर, भैय्याजी मानकर, बाळू आंबेकर, किशोर पोतनवार, अनिल राईकवार, मुन्ना खोब्रागडे, जितेंद्र डोहने, कमलेश रामटेके, जयप्रकाश कांबळे, सौ. वैशाली साव, अंकुश बाघमारे, सौ. विद्या निब्रड, निलेश बनकर, सचिन मानकर, धनश्याम बनकर, मनोहर डोर्लीकर आदी दिक्षाभूमी बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिक्षाभूमीचे पावित्र्य आणि बौद्ध समाजाच्या अस्मितेचे हे प्रतीक जपण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. लवकरच या मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर पुढील तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील या वेळी देण्यात आला.
 
                                    


