Thursday, April 16, 2026
HomeCrimeदेशी कट्टा व काडतूस जप्त ; दोघांना अटक

देशी कट्टा व काडतूस जप्त ; दोघांना अटक

Illegal country-made rifles and cartridges seized in Brahmapuri – two accused arrested

ब्रम्हपुरीत अवैध गावठी कट्टा व काडतूस जप्त – दोघे आरोपी अटकेत

चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :- स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर LCB यांनी एक धडक कारवाई करत ब्रम्हपुरी तालुक्यातील किन्ही गावातून अवैध देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले असून या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. Illegal country-made rifles and cartridges seized in Brahmapuri

दि. १९ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार मौजा किन्ही येथे छापा टाकण्यात आला. छाप्यामध्ये गणेश उर्फ गोलू बक्षी सोनवणे (वय २६, रा. किन्ही, ता. ब्रम्हपुरी) याच्या ताब्यातून गावठी कट्टा व दोन काडतूस मिळून आले.

तपासादरम्यान सोनवणे याने सदर शस्त्र व काडतूस त्यास अक्षय भजनदास शेंडे (वय २९, रा. मालडोंगरी, ता. ब्रम्हपुरी) याने दिल्याची कबुली दिली. त्यामुळे दोघांनाही अटक करण्यात आली असून, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आरोपींना पुढील कारवाईसाठी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. Local Crime Branch Chandrapur

सदर कारवाई चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन तसेच अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, तसेच पोहवा सचिन गुरनुले, गणेश भोयर, अजित शेंडे, नितेश महात्मे व मिलिंद जांभुळे यांनी यशस्वी पार पाडली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular