Friday, January 17, 2025
HomeAccidentआमदारांची माणुसकी : अपघातग्रस्त युवक युवतीला स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात नेले

आमदारांची माणुसकी : अपघातग्रस्त युवक युवतीला स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात नेले

Humanity of MLAs:                                     MLA Kishor Jorgewar took the accident victim to the hospital in his own vehicle

अपघातग्रस्त युवक-युवतीला आमदार जोरगेवार यांनी स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात नेले*

*आमदारांची माणुसकी, वरोरा नाका चौकातील घटना*

चंद्रपूर :- वरोरा नाका चौकात अपघात Accident झाल्यानंतर जखमी झालेल्या युवक आणि युवतीला आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर स्वतः उभे राहून, आमदार किशोर जोरगेवार यांनी दोघांवर उपचार करून घेतले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या या माणुसकीची सर्वत्र प्रशंसा होत आहे. Humanity of MLA Kishor Jorgewar

15 ऑगस्टला कार्यक्रम आटोपून रात्री 10 वाजताच्या सुमारास घुटाळा गावातून चंद्रपूरला परत येत असताना वरोरा नाका चौकात अपघात झाल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच आपल्या वाहनांचा ताफा थांबविला. यावेळी, एक 20 वर्षीय युवक आणि 22 वर्षीय तरुणी जखमी अवस्थेत पडलेले होते. कोणीही त्यांची मदत करत नसल्यामुळे, आमदार किशोर जोरगेवार यांनी दोन्ही जखमींना स्वतःच्या वाहनात टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.

यावेळी स्वतः आमदार रुग्णालयात आल्यामुळे येथील डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले. उपचार पूर्ण होईपर्यंत जवळपास तासभर आमदारांनी रुग्णालयातच ठाण मांडले होते. आमदार किशोर जोरगेवार यांनी दाखविलेल्या माणुसकीबद्दल जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले.

दोन दुचाकींच्या धडकेत हा अपघात झाल्याची माहिती आहे. युवती कोरपणा येथील तर युवक चंद्रपूर येथील रहिवासी आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

वेळीच आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांच्यावर योग्यवेळी उपचार करता आल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

जखमी अवस्थेत रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले हे युवक-युवती ला कोणीही रुग्णालयात दाखल न करता रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करत बसले होते. मात्र आमदार किशोर जोरगेवार यांच्या माणुसकीमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular