Grand state-level half-marathon organized in Chandrapur in memory of the late MP Balubhau Dhanorkar
चंद्रपूर :- मराठा चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूरच्या वतीने दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर Late MP Balubhau Dhanorkar यांच्या स्मरणार्थ एका भव्य राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी सकाळी ६:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. Grand state-level half-marathon
‘रन फॉर इन्स्पिरेशन, रन फॉर बाळूभाऊ’ या संकल्पनेवर आधारित ही मॅरेथॉन स्पर्धा स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार भद्रावती ते पडोली चौक, चंद्रपूर या मार्गावर पार पडणार आहे. या क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत आपली नोंदणी करता येणार आहे.
या स्पर्धेमध्ये धावपटूंचा उत्साह वाढवण्यासाठी लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
यामध्ये खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्यास १,००,००० रुपये, द्वितीय क्रमांकास ५१,००० रुपये आणि तृतीय क्रमांकास ३१,००० रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल.
यासोबतच महिला स्पर्धकांसाठी विशेष बक्षिसे ठेवण्यात आली असून, अनुक्रमे १५,०००, १०,००० आणि ५,००० रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच स्थानिक धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील स्पर्धकांसाठी विशेष पारितोषिके जाहीर करण्यात आली असून, त्यामध्ये प्रथम २१,००० रुपये, द्वितीय ११,००० रुपये आणि तृतीय क्रमांकास ७,००० रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी काही महत्त्वाचे नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी धावपटूंचे वय १८ वर्षे किंवा त्यावरील असणे अनिवार्य आहे. सर्व स्पर्धकांनी ओळखपत्रासाठी आपले आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. शारीरिक व्याधी किंवा कोणताही आजार असणाऱ्या व्यक्तींनी या स्पर्धेत सहभागी होऊ नये, अशी सूचना आयोजकांनी केली आहे. तसेच राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या बाहेरील स्पर्धकांच्या राहण्याची उत्तम सोय आयोजकांच्या वतीने चंद्रपूर येथे केली जाणार आहे.
या भव्य राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी आणि अधिक माहिती किंवा नाव नोंदणीसाठी इच्छुकांनी अनिल नरुले (९८९०२४७१९३), अतुल वाघमारे (९०४९९०४५९७), मनीष दास (८६५७५०३७९६) किंवा दुर्वास गर्गेलवार (९५५२६८००९३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रतिभा बाळूभाऊ धानोरकर यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या या ऐतिहासिक धावण्याच्या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडूंनी आणि क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
