Wednesday, October 1, 2025
HomeCrimeएटीएम फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

एटीएम फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

Interstate gang of ATM robbers busted

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने LCB एटीएम कटिंग करून लाखो रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत राजस्थानातील जिल्ली सिरदार खान (वय ५२, रा. सबलगड, ता. कामा, जि. भरतपूर) याला तेलंगणातील चिन्नुर येथून अटक केली असून फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. Interstate gang of ATM robbers busted

दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री पोरटे घुग्घुस अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र, पांढरकवडा रस्त्यावरील एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्यात आला. अज्ञात आरोपींनी या एटीएम मशिनमधून तब्बल १०,९२,८०० रुपये ची रोकड चोरी केली. घटनेबाबत घुग्घुस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. १८४/२०२५ कलम ३०५, ३३१ (४), ३३४ (१) भारतीय न्याय संहिता सन २०२३ प्रमाणे नोंद करण्यात आला. Local Crime Branch

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलीस निरीक्षक अमोल काचोरे (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) यांना आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्याचे आदेश दिले, दोन वेगवेगळ्या दिशांना पथके रवाना करण्यात आली, सलग १३ दिवस दिवस – रात्र अथक प्रयत्न करून सुमारे ९०० ते १००० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत, तांत्रिक तपास व कौशल्यपूर्ण गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. या तपासातून राजस्थानातील जिल्ली सिरदार खान यास चिन्नुर, जि. मंचेरियाल (तेलंगणा) येथून ताब्यात घेण्यात आले. त्याला पुढील तपासासाठी घुग्घुस पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरार आरोपी साजीद खान राजुददीन, रा. भाकडॉजी, पो. स्टे. फिरोजपुर झिरका, जि. नुह, हरियाणा, शैकुल उन्नस खान, रा. सावलेर, पो. स्टे. पहाडी, जि. डिग, राजस्थान आणि काला, रा. गुमटकी, बडकली चौकी, पो. स्टे. नगीना, जि. नुह, हरियाणा यांचा शोध सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, पोहया इम्रान खान,  किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, शशांक बादामवार,  मिलिंद जांभुळे, रुषभ बारसिंगे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी पार पाडली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular