Thursday, April 2, 2026
HomeEducationalकमलादेवी शिक्षण महाविद्यालयात फ्रेशर पार्टी उत्साहात

कमलादेवी शिक्षण महाविद्यालयात फ्रेशर पार्टी उत्साहात

Freshers’ Party Held with Great Enthusiasm at Kamaladevi College of Education

चंद्रपूर :- सर्वोदय महिला मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, बालाजी वार्ड येथे बी.एड. प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर पार्टीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. सर्वोदय महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. निलजी बजाज यांच्या परवानगीने हा कार्यक्रम पार पडला. Freshers’ Party Held at Kamaladevi College of Education

प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवणार…….

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमकांत वाकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सौ. अनुराधा ढोक (सदस्य, सर्वोदय महिला मंडळ), डॉ. मनोज बसेशंकर (प्राचार्य, बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन) व श्री. डी. के. चौधरी (उपप्राचार्य, बजाज चंद्रपूर तंत्रनिकेतन) उपस्थित होते. तसेच प्राध्यापक वर्गात प्रा. शमिना अली, प्रा. वनिता हलकरे, प्रा. राजकुमार भगत आणि ग्रंथपाल चंदन जगताप यांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व माल्यार्पणाने झाली. स्वागतगीताने वातावरण भारावून गेले. प्रास्ताविक प्रा. शमिना अली यांनी केले. प्रमुख पाहुणे डॉ. मनोज बसेशंकर यांनी विद्यार्थ्यांनी भावी आदर्श शिक्षक होण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. हेमकांत वाकडे यांनी शिक्षक हे केवळ नोकरी नसून समाज घडविण्याची मोठी जबाबदारी असल्याचे सांगितले.

यावेळी प्रा. राजकुमार भगत यांनी यशासाठी शिस्त, मेहनत, धैर्य, जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. तसेच भारतीय रिझर्व्ह बँक स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमात बी.एड. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे भेटवस्तू देऊन स्वागत केले. यानंतर विद्यार्थ्यांनी मनोगत, कॅटवॉक, नृत्य व विविध खेळ सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

सूत्रसंचालन प्रियंका चिंवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बुलबुल करमनकर यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. प्रगती बच्चूवार, प्रा. सूचिता खोब्रागडे, प्रा. अश्विनी सातपूडके, प्रा. डॉ. जयमाला घाटे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular