Organized Freshers Day and Farewell Party at Kalyan College of Nursing
चंद्रपूर :- सोसायटी राजुरा द्वारा संचालित कल्याण काॅलेज आँफ नर्सिंग राजुरा येथे बीएससी नर्सिंग, एएनएम, जीएएनएम, आणि पोस्ट बीएससी नर्सिंग अंतर्गत जीएनएम तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आणि फर्स्ट इयर च्या विद्यार्थ्यांसाठी प्रेशर पार्टी चे आयोजन करण्यात आले. Freshers Day and Farewell Party at Kalyan College of Nursing
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या हस्ते तर बक्षीस वितरण माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी विद्यार्थ्यांनी रॅम्पवाक, प्रश्नमंजुषा स्पर्धा, एकल नृत्य, समुह नृत्य, गीतगायन, एकांकिका असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी जीएनएम तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. तर नवप्रवेशीत विद्यार्थ्यांचे बहारदार स्वागत करण्यात आले.
मीस फ्रेशर म्हणून जीएएनएम मधून कु. श्रृती गेडाम, बीएससी नर्सिंग मधून कु. आयुषी सोनटक्के, एएनएम मधून कु. दिक्षा धांडे, मिस्टर फ्रेशर म्हणून एएनएम मधून हर्षल भांदककर, बीएससी नर्सिंग मधून जय राठोड, यांची निवड करण्यात आली. या सर्वाना माजी आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. Pledge of Patient Service Highest Social Service Work : Subhash Dhote
यावेळी माजी आमदार सुभाष धोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, रूगसेवेचे व्रत सर्वोच्च सामाजिक सेवेचे कार्य असून कल्याण काॅलेज आँफ नर्सिंग च्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील व्यावसायिक तंत्रज्ञान, उत्तम कौशल्य आणि आवश्यक संस्कार मुल्य आत्मसात करून जीवनात नेत्रदीपक प्रगती व यश संपादन करावे तर उद्घाटन पर मार्गदर्शनात माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी सांगितले की, आरोग्याची काळजी सर्वांना असते, कोरोना काळात आरोग्य सेवेचे महत्त्व सर्वांना कडले त्यामुळे नर्सिंग च्या क्षेत्रात भविष्यात मोठय़ा संधी उपलब्ध आहेत तेव्हा विद्यार्थ्यांनी परिश्रमातुन यशस्वी व्हावे.
यावेळी इन्फंट जिजस सोसायटीचे अध्यक्ष अभिजीत धोटे, कल्याण काॅलेज आँफ नर्सिंगचे प्राचार्य संतोष शिंदे, प्रा. रामटेके मॅडम, प्रा. प्रफुल्ल शेंडे, प्रा. समिर पठाण, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, स्पर्धेचे परीक्षक श्रीनिवास आरेवार, रितु सोनतुरे यासह कल्याण काॅलेज आँफ नर्सिंग अंतर्गत सर्व विभागाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.



