Statement by Bahujan Employees Federation of India to World Dhamma Organization WBF Thailand for Liberation of Mahabodhi Mahavihar
चंद्रपूर :- बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी विहारावरील Mahabodhi Mahavihar Bodhagaya येथील प्रस्थापित ब्राह्मण पंडित व पुजारी यांनी केलेले अतिक्रमण काढून महाबोधी विहार हे येथील बौद्ध धम्माचे अनुसरण आणि आचरण करणाऱ्यांचे ताब्यात देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया B.E.F. या राष्ट्रीय ट्रेड युनियन तर्फे बौद्धांची जागतिक धम्म संघटना वर्ल्ड फेलोशिप आफ बुद्धीस्ट (डब्ल्यू एफ बी) WFB ब्यांकाक, थायलंड यांना सादर करण्यात आले. Free the Mahabodhi Mahavihar
सदर प्रकरणाची दखल घेतलेली असून या संदर्भात सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. Statement by Bahujan Employees Federation of India to WBF
डब्ल्यू एफ बी च्या स्थायी समितीचे उपाध्यक्ष तसेच बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय संघटन सचिव प्रा .डॉ. टी. डी. कोसे, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे, राष्ट्रीय सल्लागार अरविंद सोनटक्के (आय.आर.एस.) माजी आयकर आयुक्त, राष्ट्रीय महासचिव पी.एच.गवई, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा शेषराव रोकडे, राज्याचे महासचिव प्रा.डॉ.रविकांत महींदकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.डॉ.चरणदास सोळंके , राज्याचे संघटन सचिव सिद्धार्थ डोईफोडे, कोषाध्यक्ष प्रा.अशोक ठवळे,सहसचिव नवनाथ देरकर, महाराष्ट्र राज्याचे सचिव सिद्धार्थ सुमन तसेच नरेश मूर्ती,चंद्रपूर जिल्हा सचिव संजय खोबरागडे यांनी सदर निवेदन सादर केले.



