Country-made katta (firearm) and live cartridge seized; two arrested
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरLCB पथकाने घुग्घुस परिसरात धाड टाकून Police Raid गावठी बनावटीचे अग्निशस्त्र आणि जिवंत काडतूस जप्त करत दोन आरोपींना अटक केली. या कारवाईत एक देशी कट्टा आणि एक नग जिवंत काडतूस असा सुमारे २५,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. firearm and live cartridge seized; two arrested
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, घुग्घुस येथील शास्त्रीनगर परिसरातील सोनुलाल उर्फ नन्नु कैथल (वय २८) याच्या घरावर पंचासमक्ष छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान त्याच्याकडून कट्टा व काडतूस आढळून आले. पुढील चौकशीत त्याने ही शस्त्रे मासिन निसार शेख (वय २८, रा. गांधीनगर, घुग्घुस) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपीलाही अटक केली. Chandrapur Crime
या प्रकरणी दोघांविरुद्ध कलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा क्रमांक १३७/२०२५ नोंदवण्यात आला असून, पुढील तपास घुग्घुस पोलिस ठाणे करीत आहे. Local Crime Branch
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, सुनिल गौरकार, सुभाष गोहोकार, रजनीकांत पुठ्ठावार, सतिश अवथरे, दिपक डोंगरे, इमरान खान, किशोर वाकाटे आणि हिरालाल गुप्ता यांनी केली आहे.
