Festival special trains will run to Pune and Mumbai for railway passengers of Chandrapur, Yavatmal districts
चंद्रपूर / यवतमाळ :– सणासुदीच्या दिवसांमध्ये जिल्ह्याबाहेर वास्तव्य करणाऱ्या, शैक्षणिक कारणामुळे पुणे, मुंबई व इतरत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच जिल्ह्यातुन आपल्या स्वगृही जाणाऱ्या व व्यवसाय आणि अन्य प्रयोजनार्थ प्रवास करणाऱ्या नागरिकांना रेल्वेची सुलभ सेवा उपलब्ध व्हावी याकरिता Festival Special Train फेस्टीव्हल स्पेशल ट्रेन गाड्या सुरू करण्याकरिता पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे वर्तमान अध्यक्ष हंसराज अहीर Hansraj Ahir यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व संबंधित महाप्रबंधकांशी भेट घेवून या गाड्या सुरू करण्याकरिता प्रभावीपणे पुढाकार घेतल्याने यंदा पहिल्यांदाच चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील रेल्वे प्रवाश्यांच्या सुविधेकरिता फेस्टीव्हल स्पेशल गाड्या सुरू होत असल्याने चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समिती व अन्य रेल्वे संघटनांनी हंसराज अहीर यांचे तसेच रेल्वेमंत्री व अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहे.
दिवाळी व अन्य सणांच्या पार्श्वभुमीवर ट्रेन नं. ०१४५१ पूणे-करीमनगर दि. २१ ऑक्टो. २०२४ रोजी तर ट्रेन नं. ०१४५२ दि २३ऑक्टो. २०२४ रोजी करीमनगर-पूणे प्रवाशांच्या सुविधेसाठी सोडण्यात येत आहेत. याबरोबरच ट्रेन नं. ०७१९७ काजीपेठ-दादर (साप्ता.) दि.१२ऑक्टो. २०२४ रोजी तर ट्रेन नं. ७१९८ दादर-काजीपेठ दि.१३ ऑक्टों. २०२४ रोजी प्रत्येक रविवारी प्रवाशांच्या सेवेत रूजु होत आहे.
या विशेष गाड्यामुळे चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या व या जिल्ह्यांमधुन सणासुदीकरिता जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय झाली असून सरकारी व खासगी बसेसमधून येजा करणाऱ्या प्रवाशांचा मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास कमी होणार आहे. त्यामुळे प्रवासी बांधवानी या विशेष रेल्वे गाड्यांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन हंसराज अहीर यांनी व रेल्वे संघटनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. Hansraj Ahir’s successful efforts were thanked by railway organization and passengers
ट्रेन नं. १४५१ पूणे-करीमनगर सोमवार दि. २१ऑक्टो. २०२४ रोजी पूणे येथून रात्री २२:४५ वा. रवाना होवून अहमदनगर ०२:०० वा मनमाड-०५:२०, औरंगाबाद-०७:३५, जालना-०८:३२, नांदेड-१२:१५, आदिलाबाद-१६:१०, चंद्रपूर-२०:३७, बल्लारशाह-२१:५०, करीमनगर बुधवारी पहाटे ०२:०० वा. पोहचेल.
ट्रेन नं. ०१४५२ करीमनगर-पूणे बुधवार दि. २३ ऑक्टो २०२४ रोजी स. ०६:०० वा. रवाना होवून बल्लारशाह येथे १०:१० वा. चंद्रपूर: १०:३०, आदिलाबाद-१३:५५, नांदेड-१७:३५, जालना-२०:२२, औरंगाबाद-२१:४५, मनमाड गुरूवारी पहाटे ०२:२५, अहमदनगर-०६:०२, पूणे-०९:४५ वा. पोहचेल. या स्टेशना व्यतिरिक्त दौंड, परभणी, पूर्णा, पिंपळखुटी, किनवट, बोधादी, सहस्वाकुंड, हिमायतनगर, भौकर, मुदखेड, सेलु, पारतूर, रोटेगाव, कोपरगाव, माजरी, शिरपूर कागजनगर, मंचेरियल, रामगुंडम व पेदापल्ली या स्थानकावर ही ट्रेन थांबणार आहे.
ट्रेन नं. ०७१९७ काजीपेठ-दादर (साप्ता.) प्रत्येक शनिवार दि. १२ ऑक्टो.२०२४ रोजी स. ११:३० वा रवाना होवून बल्लारशाह येथे १६:०५ वा चंद्रपूर-१६:२५,भांदक-१६:४५, वणी-१७:२५, आदिलाबाद-२१:३५, नांदेड-०१:४५, (रविवार) जालना-०५.००. औरंगाबाद ०६.२०, मनमाड-०८:५०, नाशिक-०९:४५, कल्याण-१२:२५, ठाणे-१२:४५ व दादर-१३:२५ वा. पोहचेल.
ट्रेन नं. ०७१९८ दादर-काजीपेठ (साप्ता.) प्रत्येक रविवारी दि.१३ ऑक्टो.२०२४ रोजी रात्री २१:४५ वा. रवाना होवून ठाणे-२२:०५, कल्याण-२२:२५, नाशिक (सोमवार) ००:४०, मनमाड-०१:५०, औरंगाबाद-०४:१५, जालना-०५:२२, नांदेड-०९:४५, आदिलाबाद-१४३५, वणी-१७:१५, भांदक- १८:१०, चंद्रपूर-१८:४०, बल्लारशाह-१९:५५, काजीपेठ-२३४५ वा. पोहचेल.
वरील स्थानकाव्यतिरिक्त इगतपुरी, नागरसोल, रोटेगाव, लासुर, पारतुर, सेलु, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, पिंपळखुटी, लिमती, कायर, शिरपूर कागजनगर, बैलमपल्ली, मंचेरियल, पेदापल्ली, जम्मीकुंटा स्थानकावर सुध्दा हि ट्रेन थांबणार आहे.
प्रवाश्यानी या फेस्टीवल विशेष ट्रेन चा लाभ घेवून आपला प्रवास सुखकर करावा असे आवाहन रेल्वेच्या सुत्रांनीही केले आहे.