Earthquake in Chandrapur through ‘Earthquake App’
चंद्रपूर :- वरोरा तालुका परिसरात 3.2 रिश्टर स्केलचा भूकंप नोंद झाल्याची माहिती भूकंप अॅपद्वारे प्राप्त झाली. या घटनेचा केंद्रबिंदू चंद्रपूरजवळ असल्याचे समजते.
तथापि, वरोरा परिसरातील नागरिक, विशेषतः मार्दा व एकोना गावातील रहिवासी, तसेच स्थानिक पोलीस पाटील व तलाठी यांच्या मार्फत खात्री केली असता कोणत्याही प्रकारचे भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे सांगण्यात आले. Earthquake in Chandrapur through ‘Earthquake App’
यासंदर्भात वेकोली खदान व्यवस्थापनाकडूनही तपासणी करण्यात आली असून, सध्या कोणतेही नुकसान किंवा धोक्याची नोंद झालेली नाही.
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, ही नोंद तांत्रिक स्वरूपाची असून नागरिकांनी घाबरून नये असे आवाहन करण्यात आले आहे.