Saturday, May 30, 2026
HomeCrimeचंद्रपूर जिल्ह्यातील ३१३ किलो अंमली पदार्थ नष्ट

चंद्रपूर जिल्ह्यातील ३१३ किलो अंमली पदार्थ नष्ट

313 kg of drugs destroyed in Chandrapur district

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील अंमली पदार्थ नाश करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार १६ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल १७ गुन्ह्यांतील जप्त अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला. 313 Kg. Of Drugs destroyed in Chandrapur district ‘मी आज तुमच्यामुळे जीवंत आहे’… चिमुकलीच्या सहा शस्त्रक्रिया

सदर कारवाईत १६ गुन्ह्यांतील ३०५ किलो ८८६ ग्रॅम गांजा तसेच १ गुन्ह्यातील ८ किलो ५० ग्रॅम डोडा पावडर असा एकूण ३१३ किलो ९३६ ग्रॅम अंमली पदार्थांचा नाश करण्यात आला. ही कार्यवाही माननीय न्यायालय, चंद्रपूर व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या परवानगीने, नागपूर येथील Maharashtra Enviro Power Limited (Butibori Unit) येथे करण्यात आली.

अंमली पदार्थ नाश समितीच्या देखरेखीखाली पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या वेळी अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, पो.नि. अमोल काचारे, स.फौ. अरुण खारकर, पो.हवा. प्रमोद डंभारे, पो.हवा. सुधीर मत्ते, पो.हवा. दीपक डोंगरे, पो.कॉ. प्रदीप मडावी, अमोल सादें, मिलिंद टेकाम आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular