Dhariwal Infrastructure Limited honored by Panchayat Samiti Chandrapur
चंद्रपूर :- धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीकडून गेल्या काही वर्षांपासून सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील येरूर, सोनेगाव, शेनगाव, पांढरकवडा, वडा, अंतुर्ला, ताडाळी, मोरवा, चारगाव व धानोरा या दहा गावांमध्ये उल्लेखनीय कार्य करण्यात येत आहे.
शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, ग्रामविकास व महिला सक्षमीकरण या क्षेत्रात कंपनीने सातत्यपूर्ण व प्रभावी उपक्रम राबवले आहेत. या समाजोपयोगी योगदानाबद्दल पंचायत समिती चंद्रपूर यांच्यातर्फे धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचा नुकताच सत्कार करण्यात आला. Dhariwal Infrastructure Limited honored by Panchayat Samiti Chandrapur
या गौरव सोहळ्याला धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चरचे मुख्य व्यवस्थापक मा. संजित रावत सर आणि डॉ. अनिश नायर सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी (BDO) मा. संगीता बांगरे मॅडम, गटशिक्षणाधिकारी (BEO) श्री. निवास कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, आरोग्य विभागाचे अधिकारी व युनियन लीडर्स यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ पार पडला.
धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच इतर कंपन्यांसाठी आदर्श ठरणारा आहे.